बदलामुळे ७/१२ बनला अधिक सोपा, सुटसुटीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 06:44 PM2020-09-05T18:44:03+5:302020-09-05T18:47:40+5:30

जमिनीचा ७/१२ म्हटले की शेतीच्या मालकी हक्काचा पुरावा; पण शासकीय भाषेमुळे तो समजण्याच्या पलीकडचा. त्यातूनच घोळ व्हायचे, अनेकांकडून फसवणूक व्हायची. याची दखल घेऊन महसूल विभागाने नुकताच यात बदल केला. तब्बल ५० वर्षांनंतर झालेल्या या ११ बदलांमुळे ७/१२ उतारा अधिक सोपा, सुटसुटीत आणि सर्वसामान्यांना कळेल अशा भाषेत आता समोर येत आहे. ​​​​​​​

The change made 7/12 easier, more convenient | बदलामुळे ७/१२ बनला अधिक सोपा, सुटसुटीत

बदलामुळे ७/१२ बनला अधिक सोपा, सुटसुटीत

Next
ठळक मुद्देबदलामुळे ७/१२ बनला अधिक सोपा, सुटसुटीत ५० वर्षांनंतर पहिल्यांदाच बदल : शेती, बिगरशेतीसाठी वेगवेगळे उतारे

कोल्हापूर : जमिनीचा ७/१२ म्हटले की शेतीच्या मालकी हक्काचा पुरावा; पण शासकीय भाषेमुळे तो समजण्याच्या पलीकडचा. त्यातूनच घोळ व्हायचे, अनेकांकडून फसवणूक व्हायची. याची दखल घेऊन महसूल विभागाने नुकताच यात बदल केला. तब्बल ५० वर्षांनंतर झालेल्या या ११ बदलांमुळे ७/१२ उतारा अधिक सोपा, सुटसुटीत आणि सर्वसामान्यांना कळेल अशा भाषेत आता समोर येत आहे.

राज्य सरकारच्या महसूल विभागाने २०१३ पासून ई-फेरफार हा ऑनलाईन कार्यक्रम हाती घेतला. राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्रामार्फत ही आज्ञावली विकसित करून घेण्यात आली. जुलै २०१७ पासून लिखित उतारे बंद करून ते पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात देण्यास सुरुवात झाली. या प्रक्रियेतील पुढचा टप्पा म्हणून या सातबाऱ्याच्या नमुन्यात बदल करून तो अधिकाधिक लोकाभिमुख होईल, हे पाहिले गेले आहे.

नव्या उताऱ्याच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र शासन असा लोगो, ई महाभूमीचा लोगो असलेला वॉटरमार्क आणि ज्या गावातील सातबारा उतारा आहे, त्या गावाचा कोडही असणार आहे. हा उतारा आता आडव्या स्वरूपात असणार आहे.

सातबारा म्हणजे काय?

गाव नमुना नंबर ७ हा अधिकार अभिलेख असतो. म्हणजेच यातून जमिनीची मालकी दिसते. गाव नमुना नंबर १२ हा पीक नोंदवही म्हणजेच पीकपाण्याची नोंद दर्शविणारा असतो.

शेती बिगरशेतीसाठी आता स्वतंत्र उतारे

आतापर्यंत शेतजमिनीसाठी एकच ७/१२ असे; पण नव्या बदलामध्ये शेती व बिगरशेतीसाठी वेगवेगळे उतारे असणार आहेत. शेतीसाठी ७/१२ चा रकाना असणार आहे. बिगरशेतीसाठीच्या उताऱ्यातून १२ हटविण्यात आले आहेत. केवळ मालकी दर्शवणारा सातचा उल्लेख असणार आहे. अलीकडे बिगरशेती करून जमिनी बांधकामासाठी वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. पीकपाण्याचा रकाना काढल्यामुळे आता त्यांना पूर्ण शेतकरी असल्याचा लाभ घेता येणार नाही.


झालेले ११ बदल

१. गावाच्या नावासोबत एलजीडी कोड असणार.
२. लागवडयोग्य व खराब पोटक्षेत्राबरोबरच एकूण क्षेत्र दिसणार.
३. शेतीक्षेत्रासाठी हेक्टर आर चौरस मीटर, तर बिगरशेतीसाठी आर चौरस मीटर एककाचा वापर होणार.
४. खाते क्रमांक इतर हक्काच्या रकान्यात कंसात टाकण्याऐवजी खातेदाराच्या नावासोबतच असणार.
५. मयत खातेदार, संपूर्ण विक्री केलेले क्षेत्र व इतर हक्कांतील कमी केलेला कर्जबोजा अथवा ई-कराराच्या नोंदी कंसात दाखवल्या जात होत्या. आता कमी केलेली नावे व नोंदी कंस करून त्यावर एक आडवी रेषा मारून दर्शविली जाणार आहे.
६. पूर्वी नोंदवलेले परंतु निर्गत न झालेले फेरफार इतर हक्क रकान्याखाली स्वतंत्र दर्शविण्यात यावे.
७. शेवटचा फेरफार क्रमांक दिनांकासह इतर रकान्याच्या खाली ह्यशेवटचा फेरफारह्ण असा नवीन रकाना तयार करून त्यात दिसणार आहे.
८. सर्व जुने फेरफार हे जुने फेरफार म्हणून केलेल्या नवीन रकान्यात दिसणार आहेत.
९. कोणत्याही दोन खात्यांतील नावांमध्ये डॉटेड लाईन असणार.
१०. बिनशेती क्षेत्रात पोट खराब, जुडी, विशेष आकारणी, तसेच इतर हक्कांत कूळ व खंड हे रकाने वगळण्यात येणार.
११. बिनशेती क्षेत्रात गाव नमुना नंबर १२ छापून त्यात बिगरशेतीमध्ये रूपांतरित झाले असल्याचे लिहावे.

Web Title: The change made 7/12 easier, more convenient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.