नशीब बदलण्यासाठी विचार बदला

By admin | Published: February 10, 2015 12:05 AM2015-02-10T00:05:08+5:302015-02-10T00:05:54+5:30

प्रल्हाद पै : ‘गडहिंग्लज’मध्ये समाजप्रबोधन महोत्सवास प्रतिसाद

Change the mindset to change luck | नशीब बदलण्यासाठी विचार बदला

नशीब बदलण्यासाठी विचार बदला

Next

गडहिंग्लज : कर्माचे फळ कर्मात आणि विचाराचे फळ विचारातच आहे. विचाराला आकार द्या, जीवनाला आकार मिळेल. विचाराला शिस्त लावा, विचार व्यापक करा, विचार शुद्ध करा, तरच जीवनात चमत्कार घडेल. किंबहुना नशीब बदलण्यासाठी विचार बदला, असा मोलाचा सल्ला प्रल्हाद वामनराव पै यांनी दिला.सद्गुरू वामनराव पै प्रणीत जीवन विद्या मिशनतर्फे येथील म. दुुं. श्रेष्ठी विद्यालयाच्या मैदानावर आयोजित भव्य समाजप्रबोधन महोत्सवात ‘विचार बदला, नशीब बदलेल’ या विषयावर ते बोलत होते. ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तूूू एकटा सुखी होऊ शकत नाहीस, सुख पाहिजे, दिल्यानेच मिळणार’ या सद्गुरूंच्या तीन सिद्धांतावर त्यांनी सविस्तर व सोदाहरण विवेचन केले.पै. म्हणाले, नशीब म्हणजे पूर्वीच्या कर्माचे फळ आहे. आपणाला ते सुख व दु:खाच्या रूपाने मिळते. चांगले फळ मिळण्यासाठी पूर्वीचे सोडा, आजपासूनच चांगला विचार करा.सज्जन माणूस म्हणजे विचार चांगले असणारा माणूस. त्यासाठी आपल्या विचारांकडे लक्ष द्या. दु:खाचे, निराशेचे, अपयशाचे विचार अधोगतीकडे नेतात, तर सकारात्मक विचार प्रगतीकडे नेतात. चांगल्या फळासाठी चांगल्या विचारांचा प्रयत्न करा.जगातील सर्व मोठी माणसं अपयशातूनच घडली आहेत. त्यामुळे अपयशाने खचून जाऊ नका. वस्तुस्थितीचा स्वीकार करा, चुकले तरी मागे फिरू नका. प्रयत्नातूनच मार्ग निघतो. प्रयत्न करणाऱ्यांमागेच समाज उभा राहतो. त्यामुळे प्रयत्न करीत रहा. त्यातूनच नशीब बदलू शकते.
नशीब म्हणजे केवळ पैसा आणि उत्कर्ष नव्हे. उत्कर्षाने माणूस उन्मत होण्याचा धोका आहे. त्यामुळे उत्कर्षाबरोबरच माणसाची कुवत, पात्रता आणि मानवी मूल्ये वाढली पाहिजेत. चारित्र्य घडायला हवे. तरच माणूस स्मरणात राहील, असेही पै यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

नेटके नियोजन, उदंड प्रतिसाद
गडहिंग्लज शाखेच्या नामधारकांनी ‘जीवन विद्या मिशन’तर्फे आयोजित समाजप्रबोधन महोत्सवाचे नेटके नियोजन केल्यामुळे या ज्ञानमहोत्सवास उदंड प्रतिसाद मिळाला. सुमारे दहा हजार नागरिकांनी या प्रवचनाचा लाभ घेतला.

Web Title: Change the mindset to change luck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.