शेवटच्या तासाभरात बदलले पक्ष पक्षनिष्ठा बसवली धाब्यावर : अखेरच्या दिवशी

By admin | Published: September 28, 2014 12:55 AM2014-09-28T00:55:54+5:302014-09-28T00:56:40+5:30

जिल्ह्यात मजेशीर उलथापालथी; शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल

Changed party parochialism in the last hour: On the last day | शेवटच्या तासाभरात बदलले पक्ष पक्षनिष्ठा बसवली धाब्यावर : अखेरच्या दिवशी

शेवटच्या तासाभरात बदलले पक्ष पक्षनिष्ठा बसवली धाब्यावर : अखेरच्या दिवशी

Next

विश्वास पाटील ल्ल कोल्हापूर
दोन दशकांपूर्वी काळ असा होता की, एकदा एका पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतला की, त्याच झेंड्याखाली आयुष्यभराचे राजकारण केले जाई; परंतु काळ बदलला तसा हा कालावधीही बदलला. तो पाच वर्षांपर्यंत आला. मग उमेदवारीसाठी रात्रीत पक्ष बदलल्याचे अनुभवही कोल्हापूरने घेतले; परंतु त्यावरही कडी करत आज काही उमेदवारांनी तासात पक्ष बदलून निष्ठा, स्वाभिमानाच्या चिंधड्या उडवून दिल्या.
कागल मतदारसंघातून कालपर्यंत काँग्रेसमधून इच्छुक असलेले परशुराम तावरे आज, शनिवारी दुपारी भाजपमध्ये गेले. विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्याकडूनच त्यांनी उमेदवारी आणली. याच मतदारसंघात काँग्रेसने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे, सुरेश कुराडे यांच्याऐवजी गडहिंग्लजचे संतान बारदेस्कर यांना उमेदवारी दिली. संजयबाबांना अप्रत्यक्ष मदत व्हावी, असे राजकारण काँग्रेसने खेळले आहे.
चंदगड मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार संग्राम कुपेकर यांना जनसुराज्य शक्ती पक्षाने आपल्या पदरात घेतले. याच जनसुराज्य शक्ती पक्षाने गेल्या दोन निवडणुकांत स्वर्गीय नेते बाबासाहेब कुपेकर यांना टोकाचा विरोध केला. या मतदारसंघात हे दोन पक्ष एकमेकांविरोधात लढत असताना करवीर मतदारसंघात मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने जनसुराज्य शक्तीला ‘बाय’ दिला. तिथे जनसुराज्य-शेकापचे उमेदवार राजू सूर्यवंशी यांना राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे. या मतदारसंघात पक्षाचे कार्यकर्ते धैर्यशील पाटील यांनी अर्ज भरला आहे; परंतु तो पक्षाकडून नव्हे. त्यामुळे या मतदारसंघात ‘घड्याळ’ दिसणार नाही. त्याची भरपाई राधानगरी तालुक्यातील शेकाप राष्ट्रवादीचे आमदार के. पी. पाटील यांना पाठिंबा देऊन करणार आहे.
कोल्हापूर दक्षिणमध्ये ‘राष्ट्रवादी’ने आज अचानक दुर्वास कदम यांना उमेदवारी दिली. कदम हे रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) पदाधिकारी आहेत. शिरोळ मतदारसंघातही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उल्हास पाटील आज आपल्याला उमेदवारी मिळत नाही म्हटल्यावर थेट शिवसेनेत गेले. सकाळी प्रवेश व लगेच उमेदवारी घेऊन ते मैदानात उतरले आहेत. सत्त्वशील माने गेल्या चार-पाच महिन्यांत इचलकरंजी मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी कोणत्या पक्षाकडे गेले नाहीत, असा एकही पक्ष शिल्लक नाही; परंतु आज अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करण्याची त्यांच्यावर वेळ आली.

Web Title: Changed party parochialism in the last hour: On the last day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.