ऐन उन्हाळ्यात यवलुज-पोर्ले बंधाऱ्याचे पात्र कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:22 AM2021-04-06T04:22:03+5:302021-04-06T04:22:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पोर्ले तर्फ ठाणे : पन्हाळा तालुक्यातील यवलुज-पोर्ले बंधारा दरम्यानचे कासारी नदीने तळ गाठल्याने ऐन उन्हाळ्यात नदीचे ...

The character of the Yavluj-Porle dam dries up in the Ain summer | ऐन उन्हाळ्यात यवलुज-पोर्ले बंधाऱ्याचे पात्र कोरडे

ऐन उन्हाळ्यात यवलुज-पोर्ले बंधाऱ्याचे पात्र कोरडे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पोर्ले तर्फ ठाणे : पन्हाळा तालुक्यातील यवलुज-पोर्ले बंधारा दरम्यानचे कासारी नदीने तळ गाठल्याने ऐन उन्हाळ्यात नदीचे पात्र कोरडे पडले आहे. गेल्या पंधरा दिवसात नदी पात्र कोरडे पडण्याचा हा दुसरा टप्पा आहे. कासारी धरण साठा कमी असल्याने शेवटच्या टप्प्यातील यवलुज-पोर्ले नदी क्षेत्राला पाणीपुरवठा करताना पाटबंधारा विभागाला दमछाक करावी लागत आहे. ऐन उन्हाळ्यात वारंवार नदीचे पात्र कोरडे पडत असल्याने चौदा गावांच्या शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे.

कासारी नदीला गेळवडे या मध्यम प्रकल्पासह,पडसाळी, नांदारी, पोंबरे, कुंभवडे, केसरकर या लघु पाटबंधारे प्रकल्पात पाणीपुरवठा केला जातो. या नदीवर उन्हाळ्यात पाणी अडवण्यासाठी जागोजागी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत.या नदीवरील यवलुज पोर्ले हा शेवटचा बंधारा आहे. या बंधारा पाणलोट क्षेत्रात यवलूज, पडळ, सातार्डे, माजगाव, पोर्ले, खोतवाडी, देवठाणे, शिंदेवाडी, माळवाडी, उत्रे, पिंपळे, आळवे, वाघवे आदी गावे येतात.

गतवर्षी या बंधाऱ्याच्या गळतीचे काम पूर्ण झाल्यामुळे पाणी टंचाईचा प्रश्न निकालात निघाला होता. नदीला ठिकठिकाणी असणारे बंधारे पूर्ण क्षमतेने भरलेले असताना शेवटच्या यवलुज-पोर्ले बंधाऱ्यापर्यंत पुरेसे पाणी पोहाेचत नसल्याने या नदी पाणीपातळी पूर्ण क्षमतेने भरत नाही. त्यामुळे आठवड्याभरात पाणी पातळी खालावते आणि नदीचे पात्र कोरडे पडत आहे. गेले कित्येक वर्षांचा अनुभव असताना सुद्धा पाटबंधारे विभाग पुरेशा पाणी साठ्याबाबत ठोस पावले उचलत नाही. पाणीपट्टी वसूल करणाऱ्या पाटबंधारे विभागाने त्वरित पाणी प्रश्न सोडवावा अन्यथा या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

प्रतिक्रिया

नदी क्षेत्रात पाणी उपसा वाढल्याने नदीची पाणी पातळी लवकर खालावत आहे.मुख्य धरणातून पाणी सोडले असून एक दोन दिवसात पाणी पातळी वाढेल.

संभाजी काटे

(शाखा अभियंता पाटबंधारे विभाग )

Web Title: The character of the Yavluj-Porle dam dries up in the Ain summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.