कोल्हापूर महापालिकेच्या अनेक विभागांचा भार ‘प्रभारी’वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 01:06 AM2018-07-03T01:06:18+5:302018-07-03T01:07:39+5:30
कोल्हापूर महानगरपालिकेत सध्या अधिकारी कमी आणि पदे अधिक अशी अवस्था निर्माण झाल्याने प्रत्येक अधिकाऱ्यांकडे प्रभारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.
तानाजी पोवार ।
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेत सध्या अधिकारी कमी आणि पदे अधिक अशी अवस्था निर्माण झाल्याने प्रत्येक अधिकाऱ्यांकडे प्रभारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण महापालिकेतच ‘प्रभारीराज’ सुरूअसल्याचा अनुभव येत आहे.
कोल्हापूर शहराचा विकास करताना अनेक पदांची आवश्यकता असते. त्यासाठी विविध विभागांत पदे निर्माण करून त्यामार्फत कामे केली जातात; पण कोल्हापूर महानगरपालिकेत पदे अधिक व व्यक्तीकमी अशी अवस्था निर्माण झाली आहे. सर्वसाधारण सभेपुढे द्यावी लागणारी उत्तरे आणि नगरसेवकांचा आक्रमकपणा यामुळे अनेक अधिकारी अतिरिक्तपदभार घेण्यास तयार नाहीत. त्यापेक्षा निवृत्तीच बरी अशी अनेक अधिकाºयांची धारणा झाली आहे. पण, कर्मचाºयांवर अंकुश ठेवून राहिलेले आयुक्तडॉ. अभिजित चौधरी यांनी या रिक्त पदांचा अतिरिक्त भार अनुभवी अधिकाºयांकडे सोपवून महापालिकेचे ‘प्रभारीराज’वर कामकाज सुरळीत सुरूठेवले आहे.
शहरातील महत्त्वाच्या पदावरही ‘प्रभारीराज’ असल्याची अवस्था आहे. मुख्य आरोग्य अधिकारी पदावर गेले दोन वर्षे प्रभारी पदाचा कार्यभार डॉ. अरुण वाडेकर व डॉ. अरुण परितेकर यांनी सांभाळला. त्यानंतर काही काळ हा पदभार विजय पाटील यांच्याकडे होता; पण या पदाची अनुभवी व्यक्ती शोधताना पुन्हा डॉ. दिलीप पाटील यांचीच ठोक मानधनावर वर्णी लागली. त्याशिवाय पशुवैद्यकीय अधिकारी असणारे विजय पाटील यांच्याकडे प्रभारी मुख्य आरोग्य निरीक्षक पदाचा कार्यभार आहे.
संपूर्ण महापालिकेचे लेखापरीक्षण ज्यांच्यावर अवलंबून आहे अशा मुख्य लेखापरीक्षक संजय सरनाईक यांचीही यातून मुक्तता झालेली नाही, त्यांच्याकडे सद्य:स्थितीत मुख्य लेखापरीक्षक पदासह परिवहन व्यवस्थापक आणि सहायक आयुक्तही दोन प्रभारी पदे आहेत. शहरात एखादी अघटित घटना घडल्यानंतर तातडीने कर्मचारी घेऊन उपस्थित राहून प्रामाणिकपणे काम करणाºया अतिशय महत्त्वाचा अग्निशमन दलाच्या मुख्याधिकारी पदाचा प्रभारी कार्यभार हा उपमुख्य अग्निशमन दल अधिकारी रणजित चिले यांच्याकडे आहे. अनेक पदांवर प्रभारीराज असल्याचे दिसून येते. याशिवाय दोन उपायुक्त दोन पदे गेली वर्षभर रिक्त असून, ती प्रभारी अधिकाºयांकडे आहेत.
पुढील मुख्य पदे, कंसातील अतिरिक्तप्रभारी पदे
मुख्य सहायक उपायुक्त मंगेश शिंदे (उपायुक्त)
अतिरक्त आयुक्तश्रीधर पाटणकर (उपायुक्त)
ठोक मानधनावरील सहायक अधीक्षक रावसाहेब चव्हाण
(सहायक अभियंता, यांत्रिकी)
सहायक अधीक्षक राम काटकर (परवाना अधीक्षक)
अधिकारी सुधाकर चल्लेवाड (कामगार अधिकारी, र. व. का. अधिकारी)
सहायक अभियंता नारायण भोसले (उपसंचालक)
वरिष्ठ सहायक अभियंता सुरेश कुलकर्णी (जलअभियंता)