Chatrapati Shivaji Maharaj: पन्हाळा किल्ल्यावर सापडला शिवकालीन तोफगोळा, स्थानिकांकडून पुरातत्व संशोधनाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2022 05:21 PM2022-04-03T17:21:50+5:302022-04-03T17:25:01+5:30

Chatrapati Shivaji Maharaj: राजा शिवछत्रपती कोल्हापूर परीवार यांच्याकडून राबवण्यात आलेल्या पन्हाळगड स्वच्छता मोहीमेदरम्यान पुसाटी बुरुजाजवळील तटबंदीत हा लोखंडी तोफगोळा सापडला  आहे.

Chatrapati Shivaji Maharaj: artillery found at Panhala fort, Local demands archaeological department research | Chatrapati Shivaji Maharaj: पन्हाळा किल्ल्यावर सापडला शिवकालीन तोफगोळा, स्थानिकांकडून पुरातत्व संशोधनाची मागणी

Chatrapati Shivaji Maharaj: पन्हाळा किल्ल्यावर सापडला शिवकालीन तोफगोळा, स्थानिकांकडून पुरातत्व संशोधनाची मागणी

googlenewsNext

पन्हाळा- महाराष्ट्रातील विविध गड किल्ल्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील तोफगोळे किंवा इतर पुरातन वस्तू सापडत असतात. अशाच प्रकारची एक वस्तू कोल्हापूरच्या पन्हाळा किल्ल्यावर सापडली आहे. राजा शिवछत्रपती कोल्हापूर परीवार या दुर्ग स्वच्छ करणाऱ्या संस्थेस पुसाटी बुरुजाच्या तटबंदीत 1.7 किलो वजनाचा लोखंडी तोफगोळा सापडला आहे. 

राजा शिवछत्रपती कोल्हापूर परीवार ही संस्था 2014 पासून महाराष्ट्रभर दुर्गसंवर्धनाचे काम करत आहे. त्याच परीवाराचा एक विभाग कोल्हापूर परीवार दर महिन्याच्या एका रविवारी किल्ले पन्हाळगड येथे गडस्वच्छता व संवर्धन मोहीम राबवत असताना पुसाटी बुरुज परिसरात एक लोखंडी तोफगोळा सापडला आहे. या मोहिमेत एकूण 151 मावळे-रणरागिणी उपस्थित होते. त्यांनी हा तोफगोळा पुरातत्व विभागाकडे जमा केल्याचे संस्थेचे अध्यक्ष मोहन कोकणे, विजय जगदाळे यांनी सांगितले.

गेल्याच आठवड्यात अंधारबाव जवळील तटबंदीत एक फुटका लोखंडी तोफगोळा सापडला असतानाच पुन्हा हा गोळा मिळाल्याने पुरातत्व विभागाने संशोधन करणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे. 1844 साली इंग्रजांनी संपुर्ण पन्हाळा गड येथील तटबंदी व ईमारती पाडण्याच्या उद्देषाने हे तोफगोळे डागले होते. तीनदरवजा आणि परीसरात हे तोफगोळे डागले गेले, असाच समज होता. पण, नव्याने सापडलेल्या पुसाटी बुरुजाच्या बाजुस हा तोफगोळा मिळाल्याने हे तोफगोळे सिद्धिजौहारच्या वेढ्यातील आहेत का असा संभ्रम निर्माण होत आहे. दरम्यान, इतिहास संशोधकानी याचा अभ्यास करण्याची गरज असल्याची पन्हाळ्यातील नागरीकांची मागणी आहे.
 

Web Title: Chatrapati Shivaji Maharaj: artillery found at Panhala fort, Local demands archaeological department research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.