चौतीस रुग्णालयांवर छापे कोल्हापुरातील रुग्णांची लुबाडणूक : महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सर्रास पैसे घेऊन उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 01:09 AM2018-10-13T01:09:45+5:302018-10-13T01:14:32+5:30

मोफत उपचार करणे अपेक्षित असताना ‘आयुष्यमान भारत’ आणि ‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’तून रुग्णांकडून पैसे उकळणाऱ्या शहरासह जिल्ह्यातील काही रुग्णालयांची या योजनेतील नोंदणी रद्द करण्यात आली आहे.

Chattis hospital raid on Kolhapur patients: Mahatma Phule Jeevan Jaggi Yojana | चौतीस रुग्णालयांवर छापे कोल्हापुरातील रुग्णांची लुबाडणूक : महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सर्रास पैसे घेऊन उपचार

चौतीस रुग्णालयांवर छापे कोल्हापुरातील रुग्णांची लुबाडणूक : महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सर्रास पैसे घेऊन उपचार

googlenewsNext
ठळक मुद्देकोल्हापुरातील ‘अ‍ॅस्टर आधार’ रुग्णालयाला तर या योजनेतून तडकाफडकी निलंबित केंद्र सरकारची ‘आयुष्यमान भारत’ आणि महाराष्ट्र शासनाची ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे

कोल्हापूर : मोफत उपचार करणे अपेक्षित असताना ‘आयुष्यमान भारत’ आणि ‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’तून रुग्णांकडून पैसे उकळणाऱ्या शहरासह जिल्ह्यातील काही रुग्णालयांची या योजनेतील नोंदणी रद्द करण्यात आली आहे.एकूण ३४ रुग्णालयांवर दिल्ली आणि मुंबईच्या अधिकाºयांनी शुक्रवारी छापे टाकल्याने वैद्यकीय क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे. कोल्हापुरातील ‘अ‍ॅस्टर आधार’ रुग्णालयाला तर या योजनेतून तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.

केंद्र सरकारची ‘आयुष्यमान भारत’ आणि महाराष्ट्र शासनाची ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे. या दोन्ही योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील रुग्णांवर मोफत उपचार करणे सक्तीचे आहे. मात्र, बहुतांश रुग्णालये वेगवेगळी कारणे दाखवून रुग्णांकडून पैशांची लूट करीत असल्याच्या अनेक तक्रारीशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यांची गंभीर दखल घेत दिल्ली आणि मुंबईच्या वैद्यकीय अधिकाºयांचे मोठे पथक गुरुवारी (दि. ११) रात्री कोल्हापुरात दाखल झाले. शुक्रवारी सकाळी सुमारे ४० अधिकाºयांची १० पथके तयार करण्यात आली. इचलकरंजी, गडहिंग्लज, कोडोलीसह या योजनेत नोंद असलेल्या सर्व रुग्णालयांवर या पथकांनी एकाच वेळी छापे टाकून तेथील कागदपत्रांची तपासणी केली.

ज्या ठिकाणी गंभीर तक्रारी होत्या आणि त्यांमध्ये तथ्य आढळले त्या ठिकाणी जागीच या योजनेतील परवाने रद्द करण्यात आले. कोल्हापुरातील ‘अ‍ॅस्टर आधार’ येथे सायंकाळी साडेपाच ते रात्री सव्वा आठपर्यंत अधिकाºयांनी तपासणी केली. सुरुवातीला येथे संबंधित अधिकाºयांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. मात्र कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर रुग्णांकडून पैसे घेतल्याचे स्पष्ट झाल्याने या दोन्ही योजनांचे राज्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी ‘अ‍ॅस्टर आधार’चे या योजनेतून जागीच निलंबन केले.

रुग्णांच्या अनेक तक्रारी
गेली काही वर्षे या योजनेतून मोफत उपचार करणे सक्तीचे असतानाही बहुतांश रुग्णालये काही ना काही कारणे काढून रुग्णांकडून पैसे घेत असल्याच्या अनेक तक्रारी शासनाला प्राप्त झाल्या होत्या. दाखल झाल्यानंतरही उपचारासाठी टाळाटाळ करणे, कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी विलंब करणे, उपचार झाल्यानंतर जादाचे पैसे दिल्याशिवाय डिस्चार्ज न देणे असे अनेक प्रकार रुग्णालयांकडून सुरू होते. आजच्या या छाप्यामध्ये या तक्रारींमध्ये तथ्य असल्याचे स्पष्ट झाले.

आतापर्यंत राज्यातील ४५ रुग्णालयांचे निलंबन
सहा वर्षांपूर्वीपासून महाराष्ट्रामध्ये ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ कार्यरत आहे. यासाठी शासनाने आतापर्यंत २0 लाख लोकांवर मोफत उपचार करण्यासाठी पाच हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र अनेक ठिकाणी मोफत उपचाराच्या नावाखाली रुग्णांकडून भरमसाट पैसे उकळले जात असल्याचे निदर्शनास आल्याने तीन महिन्यांपूर्वी कार्यभार घेतलेले या योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी राज्यातील ४५ रुग्णालयांचे या योजनेतून निलंबन केले आहे.

‘लोकमत’मधील वृत्ताचीच चर्चा !
‘लोकमत’च्या शुक्रवारच्याच अंकामध्ये या योजनेत चुकीचे काम करणारी ‘शहरातील पाच रुग्णालये हिटलिस्टवर’ हे विशेष वृत्त प्रकाशित झाले होते. या बातमीप्रमाणेच कारवाई झाल्याने आणि शुक्रवारीच शहरासह जिल्हाभर हे छापे पडल्याने सर्वत्र याच बातमीची चर्चा सुरू होती.

बिल न देताच उकळले पैसे
काही रुग्णालयांनी औषधाचे बिल, वास्तव्याचे बिल लावल्याचे स्पष्ट झाले आहे. या योजनांमधून एकही पै न देता उपचार होणे अपेक्षित असताना काही ठिकाणी कोणतेही बिल न देताही पैसे घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
आजही कारवाईचा धडाकाएकाच दिवसामध्ये ३४ रुग्णालयांवर छापे टाकण्यात आल्याने याचा आढावा रात्री उशिरापर्यंत घेण्याचे काम डॉ. सुधाकर शिंदे करीत होते. या सर्व छाप्यांचा तपशील, कारवाई या सगळ्यांचे काम आज, शनिवारीही सुरू राहण्याची शक्यता आहे.

आबिटकर, क्षीरसागर यांच्याही होत्या तक्रारी
आमदार प्रकाश आबिटकर आणि आमदार राजेश क्षीरसागर यांनी गेल्या दोन वर्षांपासून याबाबत तक्रारी केल्या होत्या. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी याबाबत मुंबईत स्वतंत्र बैठकही घेतली होती. या दोन्ही आमदारांनी हा प्रश्न सातत्याने लावून धरला होता. अखेर एकाच दिवशी रुग्णालयांवर छापे टाकल्याने वास्तव उघडकीस आले आहे.

येथे टाकले छापे

  1. आनंद नर्सिंग होम
  2. अ‍ॅपल हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट
  3. अ‍ॅस्टर आधार हॉस्पिटल
  4. बसरगे हॉस्पिटल
  5. कॉन्टाकेअर आय हॉस्पिटल
  6. गिरिजा हॉस्पिटल
  7. गणेश हॉस्पिटल
  8. हृदया मल्टि-स्पेशालिटी हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंट
  9. जोशी हॉस्पिटल अ‍ॅँड डायलेसिस सेंटर युरॉलॉजी हॉस्पिटल
  10. कोल्हापूर कॅन्सर सेंटर च्कोल्हापूर इन्स्टिट्यूट आॅफ आॅर्थोपेडिक अ‍ॅँड ट्रॉमा
  11. कोल्हापूर किडनी अ‍ॅँड सुपर स्पेशालिटी सेंटर च्कै. केदारी रेडेकर हॉस्पिटल च्मसाई हॉस्पिटल च्मगदूम इंडोसर्जरी इन्स्टिट्यूट
  12. महालक्ष्मी हृदयालय प्रा. लि. च्मोरया हॉस्पिटल च्निरामय हॉस्पिटल
  13. पट्टणशेट्टी हॉस्पिटल च्पायस हॉस्पिटल च्रामकृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट
  14. जर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय च्संत गजानन महाराज रुरल हॉस्पिटल च्सिद्धिविनायक नर्सिंग हो
  15. स्वस्तिक च्श्री सिद्धिविनायक हार्ट फौंडेशन
  16. सिद्धगिरी हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर
  17. सनराईज हॉस्पिटल च्सुश्रूषा हॉस्पिटल
  18. वारणा इन्स्टिट्यूट आॅफ युरोसर्जरी च
  19. यशवंत धर्मार्थ रुग्णालय.

Web Title: Chattis hospital raid on Kolhapur patients: Mahatma Phule Jeevan Jaggi Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.