छत्रपती म्हणून खासदारकीपेक्षा सन्मान

By admin | Published: April 19, 2016 12:31 AM2016-04-19T00:31:33+5:302016-04-19T00:53:39+5:30

युवराज संभाजीराजे : छत्रपती शिवाजी, ताराराणींचा शनिवारी शतकोत्तरी रथोत्सव; तयारी बैठक

Chattrapani honors than MP | छत्रपती म्हणून खासदारकीपेक्षा सन्मान

छत्रपती म्हणून खासदारकीपेक्षा सन्मान

Next

कोल्हापूर : ‘छत्रपती घराण्याचा प्रतिनिधी’ म्हणून देशभरात मला खूप चांगला सन्मान मिळत आहे. खासदारकीपेक्षा तो कैकपटीने अधिक आहे, असे प्रतिपादन युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी सोमवारी येथे केले. एक परंपरा म्हणून छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्टतर्फे शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी ताराराणी यांचा रथोत्सव सुरू केला. हा रथोत्सव जनतेचा असून तो लोकोत्सव होण्याच्यादृष्टीने प्रत्येकाने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी ताराराणी यांचा शतकोत्तरी रथोत्सव शनिवारी (दि. २३) रात्री होत आहे. त्याच्या तयारीनिमित्त आयोजित बैठकीत ते बोलत होते. तुळजाभवानी मंदिरातील बैठकीस ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. रमेश जाधव, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, मराठा महासंघाचे वसंत मुळीक, आदिल फरास, माणिक मंडलिक आदी प्रमुख उपस्थित होते.
युवराज संभाजीराजे छत्रपती म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज, महाराणी ताराराणी आणि राजर्षी शाहू महाराज यांच्यामुळे मला सन्मान मिळाला. कर्नाटक सरकारने केलेल्या माझ्या सन्मानाबद्दल त्यांचा आभारी आहे. हा सन्मान माझा नसून पुरोगामी कोल्हापूरकरांचा आहे. मला अजून खूप काम करायचे आहे. त्यामुळे या सन्मानासाठी मी कोणाचेही सत्कार, अभिनंदन स्वीकारणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणी ताराराणी, राजर्षी शाहू महाराज यांचे नाव जगभर पोहोचावे या उद्देशाने रथोत्सवाची एक परंपरा म्हणून सुरुवात झाली. हा उत्सव जनतेचा असल्याने तो लोकोत्सव व्हावा. त्यादृष्टीने प्रत्येकाने त्यात सहभागी व्हावे. या उत्सवातून प्रबोधनावर भर दिला जाईल. पारंपरिक पद्धतीने पैलवानांना मान दिला जाईल.
बैठकीत बाबा महाडिक, राजू सावंत, संदीप पाटील, प्रमोद व्हरांबळे, किसन भोसले, गणी आजरेकर आदींनी सूचना मांडल्या.
यावेळी फत्तेसिंह सावंत, विनायक फाळके, श्रीराम झेंडे, गणेश खोडके, राम यादव, नगरसेविका सुरेखा शहा, नगरसेवक प्रकाश गवंडी, नियाज खान, हेमंत साळोखे, अतुल माने आदी उपस्थित होते. अ‍ॅड. राजेंद्र चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. शाहीर शहाजी माळी यांनी सूत्रसंचालन
केले. (प्रतिनिधी

रथोत्सवाबद्दल सूचना
रथोत्सवादिवशी रात्री सराफ व्यावसायिकांनी दुकाने सुरू ठेवावीत : इंद्रजित सावंत
दुष्काळग्रस्तांना या रथोत्सवाच्या माध्यमातून मदतीचा हात द्यावा : डॉ. रमेश जाधव
उत्सवात कुटुंबासह प्रत्येकाने सहभागी व्हा. : शाहीर दिलीप सावंत
मुस्लिम समाजातील शंभर कार्यकर्ते पारंपरिक वेशभूषेत सहभागी होतील : आदिल फरास

कोल्हापुरात सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी ताराराणी यांच्या शतकोत्तरी रथोत्सवाच्या तयारीनिमित्त तुळजाभवानी मंदिरात आयोजित बैठकीत युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शेजारी राजेंद्र चव्हाण, इंद्रजित सावंत, डॉ. रमेश जाधव, दिलीप सावंत आदी उपस्थित होते.

Web Title: Chattrapani honors than MP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.