चौधरीच्या अटकपूर्व जामिनावर उद्या सुनावणी

By admin | Published: October 28, 2015 10:58 PM2015-10-28T22:58:52+5:302015-10-28T22:59:49+5:30

सादरे आत्महत्त्या प्रकरण : दोन तास युक्तिवाद

Chaudhary's anticipatory bail will be heard tomorrow | चौधरीच्या अटकपूर्व जामिनावर उद्या सुनावणी

चौधरीच्या अटकपूर्व जामिनावर उद्या सुनावणी

Next


नाशिक : जळगाव येथील रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्त्या प्रकरणातील संशयित वाळू ठेकेदार सागर मोतीलाल चौधरी यांच्या अटकपूर्व जामिनावर दोन्ही बाजूच्या वकिलांनी बुधवारी (दि़२८) न्यायालयात दोन तास युक्तिवाद केला़ जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़ आऱ कदम यांनी या युक्तिवादानंतर निकाल शुक्रवारपर्यंत राखून ठेवला.
या गुन्ह्यातील संशयित सागर चौधरी याच्यावतीने अ‍ॅड. मुकेश शिंपी यांनी सादरे यांच्या सुसाईड नोटमध्ये सागर चौधरीने त्रास दिल्याचे कोठेच म्हटले नसल्याने त्यांच्या अटकेची आवश्यकता नसल्याचे सांगितले़ तर सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील राजेंद्र घुमरे यांनी न्यायालयात सांगितले की, २५ वर्षांच्या कारकीर्दीमध्ये सादरे यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही़ मात्र, जळगावमध्ये गेल्यानंतर गुन्हे दाखल होऊन निलंबनाची कारवाई झाली़ अन्याय सहन करण्याची क्षमता संपली की आत्महत्त्येचा मार्ग निवडला जातो़ पोलीस अधीक्षक सुपेकर, पोलीस निरीक्षक रायते व सागर चौधरी यांनी संगनमताने अशी परिस्थिती निर्माण केली़ सुसाईड नोटमध्ये नाव असलेला चौधरी हा सागरच असल्याने त्यांचा अर्ज नामंजूर करण्याची त्यांनी विनंती केली़ या सुनावणीत न्यायालयाच्या सुचनेवरून तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण यांनीही तपासाची प्रगती व त्यात संशयित आरोपींचा सहभाग या विषयावर आपली बाजू मांडली. न्यायालयात तब्बल सव्वा दोन तास सुरू असलेला दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकून न्यायाधीश कदम यांनी सागर चौधरी याच्या अटकपूर्व जामीनावरील आपला निर्णय शुक्रवार पर्यंत राखून ठेवला. (पान ८ वर)
पोलीस निरीक्षक सादरे आत्महत्त्येप्रकरणी अधीक्षक जालिंदर सुपेकर, पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते व वाळू ठेकेदार सागर मोतीलाल चौधरी यांच्याविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल आहे़ यातील संशयित चौधरी यांनी नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयात २० आॅक्टोबरला अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता़ यावर २६ आॅक्टोबरला दोन्ही पक्षांनी कागदपत्रे सादर केल्यानंतर बुधवारी (दि़२८) युक्तिवाद झाला़ यावेळी न्यायालयात सादरे यांच्या पत्नी माधुरी, मुलगी पूनम न्यायालयात हजर होत्या़(प्रतिनिधी)

Web Title: Chaudhary's anticipatory bail will be heard tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.