स्वस्त परदेशी सहलींचे मायाजाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:34 AM2018-12-24T00:34:01+5:302018-12-24T00:34:22+5:30

संतोष मिठारी । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : स्वस्त दरामध्ये सहलीचे पॅकेज मिळविणे, याद्वारे काही पैसे वाचविण्याच्या नादात अनेक ...

Cheap foreign tourism | स्वस्त परदेशी सहलींचे मायाजाळ

स्वस्त परदेशी सहलींचे मायाजाळ

Next

संतोष मिठारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : स्वस्त दरामध्ये सहलीचे पॅकेज मिळविणे, याद्वारे काही पैसे वाचविण्याच्या नादात अनेक
उच्च शिक्षितही सहलीबाबतच्या फसवणुकीला बळी पडत आहेत. ते टाळण्यासाठी पर्यटकांनी टुर्स आॅपरेटर्स, ट्रॅव्हल एजंट यांच्याबाबतची खात्री करण्यासह त्यांची अधिकृतता तपासणे आवश्यक आहे.
कोल्हापूरमधून परदेशात सहलींसाठी सामूहिकपणे जाणाऱ्यांच्या फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. ते टाळण्यासाठी पर्यटकांनी कोणती दक्षता घ्यावी, काय करावे, आदींबाबत पर्यटनतज्ज्ञ, टूर पॅकेज विश्लेषक यांची मते ‘लोकमत’ने जाणून घेतली. पर्यटनतज्ज्ञ बी. व्ही. वराडे म्हणाले, पर्यटकांनी सहलीचे नियोजन करताना सर्वांत पहिल्यांदा त्यांच्या शहरातील स्थानिक आणि अधिकृत असलेल्या टुर आॅपरेटर्स यांना प्राधान्य द्यावे. कुणी कमी पैशांत सहलीचे नियोजन करून देत असेल, तर त्याबाबतची अधिकृतपणे माहिती जाणून घ्यावी. त्यानंतरच पुढील पाऊल टाकावे. अधिकृतपणे काम करणारे टुर आॅपरेटर्स आणि ट्रॅव्हल्स एजंट हे इंटरनॅशनल एअर ट्रान्स्पोर्ट असोसिएशन, ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशन आॅफ इंडिया, महाराष्ट्र टूर आॅपरेटर्स असोसिएशन यांपैकी किमान एका संस्थेशी संलग्नित असतात. कमी पैशांत सहलीचे पॅकेज मिळत असल्याने फारशी खात्री, तपासणी केली जात नसल्याने अशा फसवणुकीला पर्यटक बळी पडत आहेत. टूर पॅकेज विश्लेषक समीर शेठ म्हणाले, टूर आॅपरेटर्स आणि ट्रॅव्हल एजंट्स अशा दोन पातळ्यांवर सहलीचे नियोजन केले जाते. अधिकृत टूर आॅपरेटर्स यांची देश-परदेशांत यंत्रणा, शाखा आणि कॉल सेंटर असतात. परदेशात गेल्यानंतर पासपोर्ट हरविल्यास, त्याची चोरी झाल्यास, वैद्यकीय समस्या निर्माण झाल्यास या टूर आॅपरेटर्स यांची ‘मॅन आॅन स्पॉट’ ही सुविधा उपलब्ध असते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हे टूर आॅपरेटर्स सहलीच्या पॅकेजचे पैसे रोख स्वरूपात घेत नाहीत. धनादेश, ‘आरटीजीएस’च्या माध्यमातून ते पैसे स्वीकारतात. त्याबाबतचे संदेश मोबाईल, ई-मेलद्वारा येतात. त्यामुळे संबंधित आर्थिक व्यवहार अधिकृत होतो.

कार्यालय, यंत्रणेची माहिती घ्यावी
फसवणूक करणाºया काही ट्रॅव्हल्स एजंटांचे कार्यालय, यंत्रणा नसते. ते दुसºयावर अवलंबून असतात. अधिकतर प्रमाणात ते रोख व्यवहार करतात. कमी आणि स्वस्त दरामध्ये सहल पूर्ण करून देण्याचे आमिष ते दाखवितात, असे टूर पॅकेज विश्लेषक समीर शेठ यांनी सांगितले.
कोल्हापुरातून दरमहा सुमारे सहाशे पर्यटक
कोल्हापूरमध्ये टूर आॅपरेटर्स आणि ट्रॅव्हल्स एजंट असे सुमारे ५० जण कार्यरत आहेत. त्यांपैकी आठ ते दहा टूर आॅपरेटर्स आहेत. कोल्हापूरमधून दरमहा सुमारे ६०० पर्यटक परदेश सहलीवर जातात. त्यातील अधिकतरजण हे युरोप, बँकॉक, पटाया, सिंगापूर, दुबई, बाली, जपान, आदी देशांत जातात.
पर्यटकांनी काय करावे?
टूर्स आॅपरेटर्स अथवा ट्रॅव्हल्स एजंट यांची अधिकृतता तपासावी.
जर कोणी एक लाख रुपयांची सहल ५५ ते ६० हजार रुपयांत देत असेल,तर त्याची शहनिशा आवर्जून करावी.
शक्यतो रोख स्वरूपात आर्थिक व्यवहार करणे टाळावे.
सहलीचे पैसे दिल्यानंतर त्यांची पावती घ्यावी. तिकीट मिळाल्यानंतर त्याची खात्री करून घ्यावी.

Web Title: Cheap foreign tourism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.