कोल्हापूर ‘आरोग्य उपसंचालक’ मधील सेवानिवृत्त अधीक्षकाचीच दीड लाखाला फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 03:08 PM2018-10-11T15:08:54+5:302018-10-11T15:12:03+5:30

पुणे येथील आरोग्यसेवा सहसंचालक कार्यालयात नोकरी लावतो असे सांगून दीड लाख रुपयांची फसवणूक व फोनवरुन शिवीगाळ करुन दमदाटी केल्याप्रकरणी वेगुर्ला (जि. सिंधुदूर्ग) येथील तरुणावर कोल्हापूरातील लक्ष्मीपुरी पोलिसात बुधवारी (दि. १०) गुन्हा दाखल झाला.

Cheating of one and a half lakhs of retired superintendents of Kolhapur health deputy director | कोल्हापूर ‘आरोग्य उपसंचालक’ मधील सेवानिवृत्त अधीक्षकाचीच दीड लाखाला फसवणूक

कोल्हापूर ‘आरोग्य उपसंचालक’ मधील सेवानिवृत्त अधीक्षकाचीच दीड लाखाला फसवणूक

Next
ठळक मुद्देकोल्हापूर ‘आरोग्य उपसंचालक’ मधील सेवानिवृत्त अधीक्षकाचीच दीड लाखाला फसवणूकवेगुर्लातील तरुणावर गुन्हा दाखल : मुलाला नोकरी लावण्यासाठी दिले होते पैसे

कोल्हापूर : पुणे येथील आरोग्यसेवा सहसंचालक कार्यालयात नोकरी लावतो असे सांगून दीड लाख रुपयांची फसवणूक व फोनवरुन शिवीगाळ करुन दमदाटी केल्याप्रकरणी वेगुर्ला (जि. सिंधुदूर्ग) येथील तरुणावर कोल्हापूरातील लक्ष्मीपुरी पोलिसात बुधवारी (दि. १०) गुन्हा दाखल झाला.

अभय मेघश्याम रेडकर (वय ३८, रा. आनंदी आर्केड, फेज नंबर १, बी विंग, तिसरा माळा, प्लॅट नंबर ५, बी ८, साई मंगल कार्यालयासमोर , वेगुर्ला) असे या संशयिताचे नांव आहे.

याबाबतची फिर्याद कोल्हापूर आरोग्य उपसंचालक कार्यालयाचे सेवानिवृत्त अधीक्षक प्रमोद भालचंद्र वढणेरकर ( वय ६०, रा. प्लॉट नंबर ७४, वर्षानगर, कोल्हापूर ) यांनी कोल्हापूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दिली. त्याप्रमाणे पोलिसांना याचा तपास करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

पोलिसांनी सांगितले की, प्रमोद वढणेरकर हे आरोग्य उपसंचालक कोल्हापूर कार्यालयात अधीक्षक म्हणून कार्यरत होते. अभय रेडकर याची आई वॉर्ड आया म्हणून शिरोडा (ता. वेगुर्ला) येथे काम करीत होत्या. अभय हा आईच्या कामासाठी कोल्हापूर येथील आरोग्य उपसंचालक कार्यालयात येत होता. त्यामुळे अभय रेडकर व प्रमोद वढणेरकर यांची ओळख झाली.

वढणेरकर यांनी मुलाच्या नोकरी संदर्भांत त्याच्याशी चर्चा केली. त्यावेळी अभयने पुणे येथील आरोग्य सहसंचालक कार्यालयात माझी ओळख आहे, असे सांगून वढणेरकर यांच्या मुलास ह्य पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट क्लास ३ रिक्रुटमेंटह्ण लेखी परिक्षा देण्याबाबत सांगितले. त्यांच्या मुलाने २७ आॅक्टोंबर २०१३ ला कोल्हापूर केंद्रामधून ही परिक्षा दिली.

त्यानंतर पुण्यातील साहेबांशी बोलणे झाले असल्याचे अभय रेडकर याने वढणेरकर यांना सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी मुलाच्या नोकरी करीता वेगुर्ला येथील एका राष्ट्रीयकृत बँकेत दीड लाख रुपये १७ डिसेंबर २०१४ ला अभयच्या खात्यात भरले.

लेखी परिक्षा निकालानंतर वढणेरकर यांनी अभयशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो टाळाटाळ करु लागला. त्यानंतर अभयने मेन रोड रेडी (ता. वेगुर्ला) येथील याच राष्ट्रीयकृत बँकेचा दीड लाख रुपयांचा धनादेश वढणेरकर यांना २८ आॅक्टोंबर २०१५ ला दिला. त्यांनी दुसऱ्या बँकेत हा धनादेश भरला असता, तो वटला नाही.

त्यामुळे त्यांनी अभयशी फोनवरुन संपर्क साधला असता, त्यांना ह्यअर्वाच्य भाषेत शिवीगाळ करुन तुमचे पैसे देत नाही, तुम्हाला काय करायचे कराह्ण अशी धमकी अभयने दिली. अखेर वढणेरकर यांनी याबाबत न्यायालयात फिर्याद दिली. त्याप्रमाणे सीआरपीसी १५६ ह्य३ह्ण प्रमाणे तपासाचे आदेश न्यायालयाने दिले. १७ डिसेंबर २०१४ ते आजअखेर फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Cheating of one and a half lakhs of retired superintendents of Kolhapur health deputy director

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.