कर्नाटक व कोकणातून येणाऱ्यांची कोरोना तपासणी करा : मुश्रीफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:17 AM2021-06-29T04:17:21+5:302021-06-29T04:17:21+5:30
मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये कागल तालुक्यात जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत ३,८५७ जण बाधित झाले ...
Next
मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये कागल तालुक्यात जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत ३,८५७ जण बाधित झाले आहेत. त्यापैकी ३,१४७ जण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्य:स्थितीत ५८१ सक्रिय रुग्ण आहेत. १२९ मृत्यू झालेले आहेत. कागलच्या कोविड केअर सेंटरसह गावोगावी उभारलेल्या कोविड केअर सेंटरमधून तीनशेहून अधिक बेड शिल्लक आहेत.
या वेळी जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे, डी. व्ही. शिंदे, पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे, डॉ. अभिजित शिंदे आदी प्रमुख उपस्थित होते.