जयसिंगपुरातील रुग्णालयांची बिले तपासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:24 AM2021-05-11T04:24:10+5:302021-05-11T04:24:10+5:30
जयसिंगपूर : जयसिंगपूर आणि परिसरातील हॉस्पिटल्सकडून जादा बिलांची आकारणी केली जात असल्याच्या निषेधार्थ आंदोलन अंकुश या सामाजिक संस्थेच्यावतीने सोमवारी ...
जयसिंगपूर : जयसिंगपूर आणि परिसरातील हॉस्पिटल्सकडून जादा बिलांची आकारणी केली जात असल्याच्या निषेधार्थ आंदोलन अंकुश या सामाजिक संस्थेच्यावतीने सोमवारी जयसिंगपूर येथे आत्मक्लेष आंदोलन करण्यात आले.
जादा बिलाच्या आकारणीबाबत शासकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याने डॉक्टरांचेही फावले आहे. ऑडिटरची नेमणूक केली. मात्र, त्यांच्याकडूनही गोरगरीब रुग्णांना न्याय मिळत नसल्याने धनाजी चुडमुंगे यांच्या नेतृत्वाखाली जयसिंगपूर येथील शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर सकाळी आत्मक्लेष आंदोलनास सुरुवात करण्यात आली.
कोरोना काळात शासकीय यंत्रणा मदत कार्यात कमी पडत आहे. नागरिकांना लस मिळत नाही. ऑक्सिजनची तर आणीबाणी सुरू आहे. कोविड रुग्णांकडून दुप्पट, तिप्पट दराने बिले आकारली जात आहेत. ऑडिटरनी दररोज प्रत्येक हॉस्पिटलची बिले तपासून तहसीलदार यांना अहवाल द्यावा, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात प्रभाकर बंडगर, भूषण गंगावणे, अमोल गावडे, अनिल सुतार, योगेश जाधव यांनी सहभाग घेतला होता. दरम्यान, आंदोलनस्थळी दिवसभर शासकीय अधिकाऱ्यांनी भेट दिली नसल्याने चुडमुंगे यांनी सांगितले.
फोटो - १००५२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ - जयसिंगपूर येथे आंदोलन अंकुशच्यावतीने आत्मक्लेष आंदोलन करण्यात आले.