रुग्णालयातील ऑक्सिजन यंत्रणेची तपासणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:24 AM2021-04-25T04:24:30+5:302021-04-25T04:24:30+5:30

कोल्हापूर : शासकीय तसेच खासगी कोविड रुग्णालयांतील ऑक्सिजन नलिकांची व प्रणालीची तपासणी करण्यासाठी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल अभियंते, तज्ज्ञ यांचे ...

Check the oxygen system in the hospital | रुग्णालयातील ऑक्सिजन यंत्रणेची तपासणी करा

रुग्णालयातील ऑक्सिजन यंत्रणेची तपासणी करा

Next

कोल्हापूर : शासकीय तसेच खासगी कोविड रुग्णालयांतील ऑक्सिजन नलिकांची व प्रणालीची तपासणी करण्यासाठी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल अभियंते, तज्ज्ञ यांचे पथक नेमावे. या पथकांनी वरील रुग्णालयांचे इलेक्ट्रिकल, स्ट्रक्चरल आणि फायर ऑडिटदेखील करावे, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शनिवारी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्राचार्य प्रशांत पटलवार, आय.टी.आय.चे प्राचार्य रवींद्र मुंडासे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, उपायुक्त निखिल मोरे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक पोळ, तहसीलदार अर्चना कापसे उपस्थित होत्या.

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, शासकीय तसेच खासगी अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्रनिकेतनमधील मनुष्यबळ उपलब्ध करून त्यांची पथके बनवावीत. या पथकांकडून शासकीय तसेच खासगी कोविड रुग्णालयातील ऑक्सिजन प्रणालीची तपासणी करावी. यात डी.सी.एच, डी.सी.एच.सी., सी.सी.सी. यांचाही समावेश असेल. ही तपासणी करतानाच कोणताही अपघात होणार नाही, याची काळजी आणि दक्षता म्हणून सोबतच इलेक्ट्रिकल, स्ट्रक्चरल आणि फायर ऑडिटही करावे. याबाबतचा अहवाल संबंधित रुग्णालयांना द्यावा.

यावेळी गारगोटी आय.सी. आर.ई. चे प्राचार्य जयंत घेवडे, शिवाजी विद्यापीठ डी. ओ.टी.चे संचालक प्रा. जे.एस बागी, समन्वयक महेश साळुंखे उपस्थित होते.

--

फोटो नं २४०४२०२१-कोल-कलेक्टर बैठक

ओळ : कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी रुग्णालयांच्या ऑक्सिजन तपासणीसाठी पथकाची नियुक्ती करण्याची सूचना केली.

--

Web Title: Check the oxygen system in the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.