जिल्हा बॅँकेची २० तास तपासणी

By admin | Published: December 28, 2016 12:34 AM2016-12-28T00:34:10+5:302016-12-28T00:34:10+5:30

दुसऱ्या दिवशीही पाहणी : आयकर विभागाची कारवाई

Checking of District Bank 20 hours | जिल्हा बॅँकेची २० तास तपासणी

जिल्हा बॅँकेची २० तास तपासणी

Next

सांगली : नोटाबंदीच्या निर्णयानंतर सांगली जिल्हा बँकेतील तीन दिवसांच्या कालावधित जमा झालेल्या रकमांसह अनेक संशयास्पद खातेदारांची तपासणी आयकर विभागाने मंगळवारी पूर्ण केली. तब्बल २० तास त्यांचे काम सुरू होते. मंगळवारी सायंकाळी चौकशी पूर्ण झाल्यानंतर हे पथक पुण्याला परतले.
जिल्हा मध्यवर्ती बॅँकेतील संशयास्पद वाटणाऱ्या व्यवहारांची तपासणी करण्यासाठी आयकर विभागाच्या पुण्यातील अधिकाऱ्यांनी येथील पुष्पराज चौकातील बँकेच्या मुख्य कार्यालयावर सोमवारी छापा टाकला. दुपारी दीड ते रात्री दीडपर्यंत १२ तास त्यांनी चौकशी केली. त्यानंतर मंगळवारी सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंत तपासणी सुरू होती. दोन दिवस सुरू असलेल्या या तपासणीमुळे जिल्हा बँकेतील वातावरण तणावपूर्ण होते. बँकेचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले होते. दुसऱ्यादिवशीही सहा पोलिसांचे पथक बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते.
बँकेला सुरुवातीला जुन्या नोटा स्वीकारून त्या बदलून देण्याची परवानगी होती. एकच दिवस नोटा बदलून देण्याची प्रक्रिया चालली होती. त्यानंतर नोटा बदलून देण्यास बंदी घालून केवळ नोटा स्वीकारण्याची मुभा देण्यात आली. १० नोव्हेंबर ते १३ नोव्हेंबर या कालावधित एक दिवसाच्या बंदचा अपवाद वगळता, तीन दिवस जुन्या नोटा बँकेने स्वीकारल्या. या तीन दिवसांत बँकेकडे ३०० कोटी ५ लाख १६ हजार रुपये जुन्या नोटांच्या स्वरूपात जमा झाले होते. जिल्हा बँकेचे पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या मते खातेदारांची संख्या पाहता, ही रक्कम अत्यंत कमी आहे. तरीही नाबार्ड व आयकर विभागामार्फत जमा झालेल्या रकमा व संबंधित खात्यांची चौकशी करण्यात आली आहे. चौकशीतील निष्कर्षाबद्दल दोन्ही विभागांनी कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी बँकेतील खातेदारांची माहिती सर्व्हरच्या माध्यमातून त्यांच्या पेनड्राईव्हला घेतली होती. लॅपटॉपवर त्यांनी याबाबतची तपासणी केली. संशयास्पद वाटणाऱ्या किंवा जास्त रक्कम जमा झालेल्या खातेदारांची माहितीही त्यांनी संकलित केली आहे. त्यांची पुन्हा कार्यालयीन पडताळणी होण्याची शक्यता आहे. सांगली, मिरज, इस्लामपूर, तासगाव आणि शिराळा या शाखांमधील खातेदारांचीही माहिती ‘आयकर’ने घेतल्याचे समजते. आयकरने टाकलेल्या छाप्यामुळे जिल्हा बँकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर तणाव दिसत होता. मंगळवारी सायंकाळी पाच वाजता अधिकारी निघून गेल्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. (प्रतिनिधी)

शाखांमधील स्थिती
शाखाजमा रक्कम
इस्लामपूर९,१३,७४,000
शिराळा३,८८,१९,000
तासगाव६,२0,३३,000
एकूण१९, २२,२६,000
संस्था जमा१0,६0,३८,000
व्यक्तिगत जमा८,५८,३८,000

अशी झाली रोकड जमा
खातेदार प्रकारखातेदार संख्याजमा रक्कम
व्यक्तिगत बचत खातेदार१,0३,८0४२0८,७१,१५000
व्यक्तिगत कर्जदार१,0४९३१,६६,३४,000
संस्था सभासद९१९५९,६७,६७,000
एकूण१,0५,७७२३00,0५,१६,000

Web Title: Checking of District Bank 20 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.