कर्जमाफीच्या अर्जांची आजपासून तपासणी--जिल्हाधिकाºयांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 10:17 PM2017-09-14T22:17:21+5:302017-09-14T22:23:26+5:30

Checking of loan application today - Order of Collector | कर्जमाफीच्या अर्जांची आजपासून तपासणी--जिल्हाधिकाºयांचे आदेश

कर्जमाफीच्या अर्जांची आजपासून तपासणी--जिल्हाधिकाºयांचे आदेश

googlenewsNext
ठळक मुद्देअर्ज स्वीकारण्याच्या आज शेवटचा दिवस

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने’त सहभागी झालेल्या शेतकºयांची विकास संस्था व जिल्हा बँकेने वाटप केलेल्या कर्जाच्या माहितीची तपासणी आज, गुरुवारपासून शासकीय लेखापरीक्षकांकडून सुरू करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणांनी गतिमान व्हावे, असे आदेश गुरुवारी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिले.

‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने’संदर्भात शासनाकडून आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांसंदर्भात माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. प्रमुख उपस्थिती जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे, जिल्हा अग्रणी बॅँकेचे व्यवस्थापक एस. जी. किणिंगे, आदींची होती.

राज्य सरकारने कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकºयांकडून आॅनलाईन अर्ज मागविले असून, कोल्हापूर विभागातून ८ लाख ५६ हजार शेतकºयांनी अर्ज दाखल केले आहेत. आज, शुक्रवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे. यानंतर लगेचच अर्जांची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी गुरुवारी दिले.

जिल्हा उपनिबंधक काकडे यांनी या तपासणीसाठी ८३ शासकीय लेखापरीक्षकांच्या नियुक्तीचे आदेश काढण्यात आल्याचे सांगितले. हे लेखापरीक्षक विकास संस्था व जिल्हा बँकेतील रेकॉर्डनुसार शेतकºयांची खाती तपासून त्याची विहित नमुन्यात माहिती संकलित करणार आहेत. ही महिती ते माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या लिंकद्वारे थेट अपलोड करतील. त्यानंतर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील लेखापरीक्षक, जिल्हा बॅँकेचा विकास अधिकारी, उपसहायक निबंधक यांची समिती तपासणी करून आॅनलाईनद्वारे ही माहिती सहकार आयुक्तांकडे पाठविणार आहे. या सर्व कार्यवाहीवर जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा उपनिबंधक, अग्रणी बॅँकेचे व्यवस्थापक, जिल्हा लेखापरीक्षक ही समिती लक्ष ठेवणार आहे, असे सांगितले.


जिल्'ातून ३ लाख २३ हजार अर्ज
कर्जमाफीसाठी आतापर्यंत जिल्'ातून जिल्हा बॅँकेसह राष्टÑीय बॅँकेच्या माध्यमातून अंदाजे ३ लाख २३ हजार ८२३ आॅनलाईन अर्ज आले आहेत.

 

 

 

Web Title: Checking of loan application today - Order of Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.