बुद्धिबळ : कोल्हापूरच्या अनिष गांधीला विजेतेपद
By admin | Published: May 24, 2015 11:53 PM2015-05-24T23:53:57+5:302015-05-25T00:23:57+5:30
अनुभवी अनिषने स्पर्धेच्या अखेरच्या फेरीत कागलच्या निहाल मुल्लाचा साडेसात गुणांनी पराभव करून यश मिळविले.
सांगली : प्रतिस्पर्ध्यांनी रचलेल्या चाणाक्ष चालींचा चक्रव्यूह भेदत कोल्हापूरच्या अनिष गांधीने बाळासाहेब लागू जलद बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावले. अनुभवी अनिषने स्पर्धेच्या अखेरच्या फेरीत कागलच्या निहाल मुल्लाचा साडेसात गुणांनी पराभव करून यश मिळविले. स्पर्धेचे बक्षीस वितरण अमोल ताम्हणकर, कुमार लागू व रमा लागू यांच्या हस्ते झाले. चिंतामणी लिमये यांनी स्वागत केले. यावेळी डॉ. उल्हास माळी, स्मिता केळकर, सीमा कठमाळे, आदी उपस्थित होते. राष्ट्रीय पंच दीपक वायचळ व विकास भावे यांनी पंच म्हणून काम पाहिले. स्पर्धेचा अनुक्रमे एक ते दहा क्रमांकापर्यंतचा अंतिम निकाल
असा : अनिष गांधी (कोल्हापूर), गौरव कोंडे (पुणे), पृथ्वीराज नार्वेकर (कोल्हापूर), निहाल मुल्ला (कागल), प्रणव टंगसाळे (सातारा), अभिषेक पाटील (मिरज), रवींद्र निकम (इचलकरंजी), राजू सोनेचा
(सांगली), शिरीष गोगटे (सांगली), सदानंद चोथे (सांगली). उत्कृष्ट वयस्कर खेळाडू : बी. एस. नाईक, आनंदराव कुलकर्णी. उत्कृष्ट महिला खेळाडू : पौर्णिमा उपळावीकर, प्रियांका शिंदे. नूतन बुद्धिबळ मंडळाने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. सांगलीतील बापट बाल शिक्षण मंदिरमध्ये या स्पर्धा सुरू आहेत.