राष्ट्रीय सहकार धोरण अभ्यास समितीवर कोल्हापूरचे चेतन नरके

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2023 02:14 PM2023-12-30T14:14:27+5:302023-12-30T14:16:04+5:30

कोल्हापूर : राष्ट्रीय सहकार धोरण - २०२३ मधील शिफारशींचा अभ्यास करून राज्याच्या दृष्टीने नवीन धोरण आखण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीवर ...

Chetan Narake on the National Cooperative Policy Study Committee | राष्ट्रीय सहकार धोरण अभ्यास समितीवर कोल्हापूरचे चेतन नरके

राष्ट्रीय सहकार धोरण अभ्यास समितीवर कोल्हापूरचे चेतन नरके

कोल्हापूर : राष्ट्रीय सहकार धोरण - २०२३ मधील शिफारशींचा अभ्यास करून राज्याच्या दृष्टीने नवीन धोरण आखण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीवर ‘गोकुळ’ दूध संघाचे संचालक डॉ.चेतन अरुण नरके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीमध्ये सहकार आयुक्तांसह सहकार विभागातील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

सहकारातून समृद्धी ही संकल्पना साकार करण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय सहकार धोरण-२०२३ तयार करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने अहवाल केंद्र सरकारकडे सादर केला आहे. त्या अनुषंगाने राज्याच्या सहकार धोरणात अनुषंगिक बदल करण्याच्या दृष्टीने राज्यातील सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती अभ्यास करून राज्याचे सहकाराचे नवीन धोरणाबाबत अहवाल सादर करणार आहे. या समितीवर डॉ.चेतन नरके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

समिती अशी..

अध्यक्ष : सहकार आयुक्त अनिल कवडे, सदस्य : सेवानिवृत्त सहकार आयुक्त मधुकर चौधरी, राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, बँकिंग तज्ज्ञ गणेश निमकर, राज्य साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, सेवानिवृत्त अप्पर आयुक्त दिनेश ओऊळकर, एस.बी. पाटील, ठाणे जिल्हा हाउसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, अकोला जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ.संतोष कोरपे, ‘गोकुळ’चे संचालक डॉ.चेतन नरके, डी.के. टी. ई. टेक्सटाईल इंजिनीअरिंग महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य सी.डी. काणे यांच्यासह पणन संचालक, साखर, वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय विभागाचे आयुक्त.

Web Title: Chetan Narake on the National Cooperative Policy Study Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.