महाराष्ट्र कृषी तंत्रज्ञान संस्था कार्यकारी समितीवर चेतन नरके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:45 AM2021-03-13T04:45:31+5:302021-03-13T04:45:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महाराष्ट्रातील कृषी पदवीधर आणी कृषी तंत्रज्ञानाची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र कृषी तंत्रज्ञान संस्थेच्या ...

Chetan Narke on Maharashtra Agricultural Technology Institute Executive Committee | महाराष्ट्र कृषी तंत्रज्ञान संस्था कार्यकारी समितीवर चेतन नरके

महाराष्ट्र कृषी तंत्रज्ञान संस्था कार्यकारी समितीवर चेतन नरके

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : महाराष्ट्रातील कृषी पदवीधर आणी कृषी तंत्रज्ञानाची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र कृषी तंत्रज्ञान संस्थेच्या ( आय. एम. ए. टी. ) कार्यकारी समितीत स्वीकृत सदस्य म्हणून चेतन अरुण नरके यांची नियुक्ती करण्यात आली. संस्थेच्या नवनिर्वाचित कार्यकारिणी सदस्यांची सभा कृषी विद्यालय पुणे येथे झाली. यामध्ये त्यांच्या नियुक्तीची घोषणा संस्थेचे अध्यक्ष आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. व्यंकट मायदे यांनी केली.

चेतन नरके हे उच्चविद्याविभूषित असून युरोप व आशियाई देशांतील प्रसिध्द अर्थ व्यवस्थापक आहेत. सध्या ते थायलंड देशाचे वित्त मंत्रालयाचे वाणिज्य सल्लागार म्हणून काम पाहत आहेत.

यावेळी उपाध्यक्ष आणि माजी कृषी आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख, डॉ. रामकृष्ण मुळे, डॉ. सुदाम अडसूळ आदी उपस्थित होते.

कोट-

माझा आजवरचा अनुभव, ज्ञान आणि या संधीचा उपयोग करून महाराष्ट्रातील कृषी मालाला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याबरोबरच शेतकऱ्याच्या मालाला अधिक भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार.

- चेतन नरके (सदस्य, आय. एम. ए. टी)

Web Title: Chetan Narke on Maharashtra Agricultural Technology Institute Executive Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.