छत्रपती संभाजीराजेंचा जयघोष
By admin | Published: May 15, 2017 12:58 AM2017-05-15T00:58:17+5:302017-05-15T01:01:41+5:30
जयंतीनिमित्त शोभायात्रा : युवक-युवतींच्या मर्दानी खेळांनी लक्ष वेधले : विविध संस्थांकडून अभिवादन
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त शहरात रविवारी सवाद्य शोभायात्रा काढण्यात आली. हलगीच्या कडकडाटात पापाची तिकटी चौकातील धर्मवीर संभाजीराजे यांच्या स्मारकाचे पूजन करून तेथून काढलेल्या शोभायात्रेत मर्दानी खेळांची पथके मोठ्या उत्साहाने सहभागी झाली होती. यावेळी धर्मवीर संभाजीराजेंचा जयजयकारही करण्यात आला.
धर्मवीर छत्रपती संभाजीराजे स्मारक समिती व अखिल भारतीय हिंदू महासभेच्या वतीने रविवारी सकाळी पापाची तिकटी चौकातील अर्ध्या गांधी पुतळ्यासमोर नियोजित स्मारक ठिकाणी जागेचे सुशोभीकरण करण्यात आले. षट्कोनी आकाराच्या स्मारकस्तंभाच्या प्रतिमेवरील सिंहाचा जबडा उघडलेल्या धर्मवीर संभाजी महाराज यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. यावेळी नगरसेवक ईश्वर परमार, रमाकांत उरसाल, महाराष्ट्र राज्य अखिल भारत हिंदू महासभेचे मुख्य संघटक संजय कुलकर्णी उपस्थित होते.
सायंकाळी महापालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या हस्ते छत्रपती संभाजीराजे यांच्या स्मारकाचे पूजन करून शोभायात्रेला प्रारंभ करण्यात आला. ही शोभायात्रा मर्दानी कलाविशारद आनंदराव पोवार प्राचीन युद्धकला शिक्षण संस्थेच्या वतीने काढण्यात आली. यावेळी उपमहापौर अर्जुन माने, नगरसेवक ईश्वर परमार, प्रतापसिंह जाधव यांच्यासह वस्ताद पंडितराव पोवार, रवी दुर्गे, सुरेश जरग, प्रसाद पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
महापालिकेतर्फे पुतळ््यास पुष्पहार अर्पणधर्मवीर संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने धर्मवीर संभाजीराजे यांच्या रुईकर कॉलनी येथील पुतळ्यास महापौर हसिना फरास यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला. यावेळी गटनेते विजय सूर्यवंशी, सत्यजित कदम, नगरसेवक आशिष ढवळे, अशोक जाधव, नगरसेविका उमा इंगळे, माजी नगरसेवक आदिल फरास, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, महादेव फुलारी आदी उपस्थितीत होते.
कणेरीत भगवा चौक येथे विविध कार्यक्रम
कणेरी (ता. करवीर) येथे धर्मवीर संभाजीराजे जयंती साजरी करण्यात आली. भगवा चौक येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या हस्ते धर्मवीर संभाजीराजे यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील-कणेरीकर, अवधूत पाटील, माजी सरपंच जयसिंग पाटील, माजी सैनिक आबासो पाटील, नारायण पाटील, राजेंद्र खेराडे, आदीसह प्रमुख मान्यरांची उपस्थिती होती.
हिंदू महासभा
महापालिका पानलाईन येथील छत्रपती संभाजीराजे स्मारक स्थळी डिजिटल स्तंभ उभा करून हिंदू महासभेतर्फे रविवारी धर्मवीर संभाजीराजे यांची जयंती साजरी करण्यात आली. नगरसेवक ईश्वर परमार, हिंदू महासभेचे राज्य संघटक संजय कुलकर्णी, विक्रम जाधव, यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून पूजन करण्यात आले. यावेळी धर्मवीर संभाजीराजे स्मारक समितीचे राम जाधव, धर्मवीर संभाजीराजे तरुण मंडळाचे अध्यक्ष संजय आंग्रे, हिंदू महासभा शहराध्यक्षा दीपाली खाडे, ब्राह्मण महासंघाचे शाम जोशी, नंदकुमार घोरपडे, मनोहर सोरप, सुनील देसाई, सुनील जाधव, रमाकांत उरसाल, प्रसाद कुलकर्णी, फिरोज सतारमेकर, आदी उपस्थित होते.
शिवशक्ती प्रतिष्ठान
धर्मवीर संभाजीराजे यांच्या ३६० व्या जयंतीनिमित्त रविवारी शिवप्रतिष्ठानतर्फे संभाजीराजे यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करण्यात आला. जयंतीनिमित्त सकाळी प्रथम पुतळा परिसराची व उद्यानाची स्वच्छता करण्यात आली. शिवरायांच्या प्रेरणामंत्राचे सामूहिक पठण करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष साताप्पा कडव, उपाध्यक्ष योगेश रोकडे, अमोल पोवार, धनंजय नामजोशी, स्वप्निल पाटील, बंडू माळी, नीलेश पिसाळ आदी शिवभक्त उपस्थित होते.