‘छावा’ अजिंक्य; ‘शाहू’वर केली मात
By admin | Published: February 16, 2015 11:56 PM2015-02-16T23:56:06+5:302015-02-17T00:05:26+5:30
प्रो कबड्डी स्पर्धा : विजयानंतर फटाक्यांची आतषबाजी; क्रीडाशौकिनांची प्रचंड गर्दी
कुरुंदवाड : येथील राष्ट्र सेवा दलाच्यावतीने आयोजित प्रो कबड्डी स्पर्धेत छावा शिरोली संघाने अटीतटीच्या अंतिम लढतीत शाहू सडोली संघावर ३१-२३ अशा आठ गुणांनी विजेतेपद पटकाविले. रविवारी मध्यरात्री झालेल्या या अंतिम सामन्याच्या विजयानंतर फटाक्यांची आतषबाजी व डॉल्बीच्या निनादात विजेत्या खेळाडूंसह क्रीडारसिकांनीही ताल धरला. विजयी संघाला रोख ५१ हजार रुपये व सन्मानचिन्ह जवाहर पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.येथील तबक उद्यानातील कै. सुरेंद्र आलासे क्रीडानगरीत गेल्या चार दिवसांपासून मातीतील व मॅटवरील आंतरराज्य कबड्डी स्पर्धा सुरू होत्या. मातीतील एकूण ४२, तर मॅटवरील १८ निमंत्रित संघ सहभागी झाले होते. संयोजकांकडून उत्कृष्ट नियोजन, मध्यरात्रीपर्यंतही पे्रक्षकांची दाद, उत्कृष्ट समालोचन यामुळे स्पर्धा अखेरपर्यंत रंगतदार ठरल्या.उपांत्य सामान्यानंतर विजेतेपदासाठी छावा शिरोली व शाहू सडोली यांच्या लढत झाली. छावा संघाच्या अक्षय पाटील याची पकड व रोहित मानेच्या चढाईपुढे शाहू संघाला हार पत्करावी लागली. शाहूच्या महेश मगदूम, कुलदीप पाटील, विशाल चव्हाण यांची खेळी संघाला तारू शकली नाही. अंतिम सामना पाहण्यास प्रेक्षकांची तुडुंब गर्दी होती. यावेळी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष खा. धनंजय महाडिक, माजी आमदार सा. रे. पाटील, प्रकाश आवाडे, उद्यान पंडित गणपतराव पाटील, जवाहर पाटील, बाळासाहेब गायकवाड, त्रिशला पाटील, माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील, दादासो पाटील, छावा शिरोली संघ मालक चंद्रकांत जोंग, शाहू सडोली संघ मालक सुरेश कडाळे, अजित पाटील, तुकाराम पोवार, अभिजित पाटील, आदी उपस्थित होते. स्पर्धेसाठी पंच म्हणून रूपेश जाधव, बाळकृष्ण ढवळे, शंकर पोवार, शहाजन शेख, अमित संकपाळ, धनाजी गावडे, बाळासो बनगे, प्रकाश कळंत्रे, युवराज गावडे, आदींनी काम पाहिले. (प्रतिनिधी)