कोल्हापूर सर्किट बेंचसाठी मुख्यमंत्र्यांचे न्यायमुर्तीना पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 05:34 PM2019-01-21T17:34:15+5:302019-01-21T17:36:33+5:30
कोल्हापूर जिल्हयासह सहा जिल्हयाचे कोल्हापूरात सर्किट बेंच व्हावे याबाबतचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (दि. १९) मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती नरेश पाटील यांना दिले. त्यामुळे कोल्हापूरकरांनी अर्धी लढाई जिंकली आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हयासह सहा जिल्हयाचे कोल्हापूरात सर्किट बेंच व्हावे याबाबतचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (दि. १९) मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती नरेश पाटील यांना दिले. त्यामुळे कोल्हापूरकरांनी अर्धी लढाई जिंकली आहे.
या पत्रानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वत:हून कोल्हापूर सर्किट बेंचबाबत न्यायमुर्ती पाटील यांच्याकडे आग्रह धरला पाहिजे. न्यायमुर्ती यांच्या मंजुरीनंतरच खऱ्या अर्थाने कोल्हापूर सर्किट बेंचचा मार्ग मोकळा होणार आहे.
कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या सहा जिल्हयातील वकिल बांधवांचा ३० सुमारे ३० वर्षे हा लढा सुरु आहे. सध्या या प्रश्नी कोल्हापूरात वकिल बांधव, नागरिक यांच्यातर्फे आंदोलन सुरु आहे.
गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी रॅली झाली. वकिलांनी कोल्हापूर बंद, २८ जानेवारीपासून न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त आणि ३० ला वकिल सनद सेरेंडर असा कृति कार्यक्रम घोषित केला होता.
दरम्यान, सोमवारी पुणे-बंगळूर महामार्गावरील चक्का जाम आंदोलनावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्यासमोर कोल्हापूर सर्किट बेंचबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती पाटील यांना पत्र दिले आहे. त्यामुळे सर्किट बेंचचा प्रश्न मार्गी लागला असल्याचे सांगितले.
या पत्रावर मुख्यमंत्री फडणवीस यांची सही आहे.त्यांनी या पत्रात कोल्हापूरसह सहा जिल्हयातील वकिलांची सर्किट बेंचबाबतची मागणी होती.त्यांच्या मागणी आणि विनंतीनूसार हे पत्र देत आहे, असे म्हटले आहे.