मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात दाखल, चंद्रकांत पाटलांची भेट घेवून केलं सांत्वन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 11:26 AM2022-07-25T11:26:53+5:302022-07-25T11:28:04+5:30
चौघे केंद्रीय मंत्री देखील चंद्रकांतदादाचे सांत्वन करण्यासाठी आजच कोल्हापुरात दाखल होणार
कोल्हापूर : भाजपा प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या आईंचे काल, रविवारी निधन झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज सोमवारी नवी दिल्लीहून कोल्हापूरला येत आहेत. नुकतेच त्याचे कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले आहे. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आहेत.
विमानतळावरुन ते छत्रपती संभाजीनगर परिसरातील चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी पोहोचले. यावेळी त्यांनी चंद्रकांतदादांचे सांत्वन केले. यानंतर मुख्यमंत्री पुन्हा विमानाने मुंबईकडे रवाना होणार आहेत.
दरम्यान, चौघे केंद्रीय मंत्री देखील चंद्रकांतदादाचे सांत्वन करण्यासाठी आजच कोल्हापुरात दाखल होणार आहेत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री कपिल पाटील, अर्थराज्यमंत्री भागवत कराड आणि आरोग्य राज्यमंत्री भारती पवार हे कोल्हापुरला येत आहेत. तसेच खासदार मनोज कोटक, संजयकाका पाटील, उन्मेश पाटील आणि रक्षा खडसे हे सुध्दा येत आहेत. सायंकाळी ७ वाजता ते चंद्रकांतदादांच्या निवासस्थानी जावून त्यांची भेट घेतील.
आमदार पाटील यांच्या आई सरस्वती पाटील (वय 91) यांचे काल, रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. रात्री त्यांच्यावर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. आमदार पाटील यांच्या आईने कष्टातून त्यांचे जीवन फुलवले होते.