मुख्यमंत्री ‘फडणवीस’ की ‘चंद्रकांतदादा’ हेच कळत नाही : नाना पटोले यांचा टोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 04:03 PM2017-11-06T16:03:27+5:302017-11-06T16:10:46+5:30
कर्जमाफीच्यावेळी रोज नवीन आदेश निघत होते. यामध्ये एक आदेश महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी काढल्यावर दुसरा आदेश मुख्यमंत्री फडणवीस काढला. त्याचबरोबर नारायण राणेंसह प्रत्येकाला मंत्री करणार म्हणून दररोज चंद्रकांतदादा सांगत आहेत. यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत की चंद्रकांतदादा हेच कळत नाही, असा टोला भाजपाचे खासदार नाना पटोले यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत हाणला. सरकारकडून जनतेची अपेक्षापूर्ती न होता नोटा बंदीतून काळा पैसा बाहेर आलाच नाही असा खळबळजनक आरोपही त्यांनी केला.
कोल्हापूर ,दि. ०६ : कर्जमाफीच्यावेळी रोज नवीन आदेश निघत होते. यामध्ये एक आदेश महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी काढल्यावर दुसरा आदेश मुख्यमंत्री फडणवीस काढला. त्याचबरोबर नारायण राणेंसह प्रत्येकाला मंत्री करणार म्हणून दररोज चंद्रकांतदादा सांगत आहेत. यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत की चंद्रकांतदादा हेच कळत नाही, असा टोला भाजपाचे खासदार नाना पटोले यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत हाणला. सरकारकडून जनतेची अपेक्षापूर्ती न होता नोटा बंदीतून काळा पैसा बाहेर आलाच नाही असा खळबळजनक आरोपही त्यांनी केला.
कोल्हापूरात एका कार्यक्रमानिमित्त खासदार नाना पटोले आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे प्रत्येकाला मंत्री करणार असे सांगतात, नारायण राणे यांनाही ते असेच सांगत आहे. त्याचबरोबर सरकारचे अनेक निर्णय स्वत: चंद्रकांत दादाच घेत असल्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री नेमकं कोण देवेंद्र फडणवीस की चंद्रकांत पाटील हे समजत नाहीत, असा टोलाही पटोले यांनी हाणला.
चंद्रकांतदादा पाटील यांनी राज्यात दहा लाख शेतकरी बोगस आहेत अशी घोषणा केली. त्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य कर्जबाजारी करायचे का? असे वक्तव्य केले होते. यावरुन सरकार शेतकऱ्यांप्रती किती संवेदनशील आहे हे दिसत आहे. केंद्र व राज्य सरकारने तीन वर्षात चांगला कारभार केल्याच्या जाहीरात करत आहे, तर मग लोक रस्त्यांवर उतरून मोर्चे का काढतात? असा खोचक सवालही खासदार पटोले यांनी उपस्थित केला.
लोकांची अपेक्षापूर्ती झाली नसल्याने केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात नाराजी वाढत असल्याचे सांगून सरकारविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. खुर्चीवर बसण्यापूर्वी व खूचीवर बसल्यावर नेत्यांच्या भूमिका बदलतात,असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लगावला.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्य सरकार उदासिनआहे. देशात सर्वात जास्त शेतकऱ्यांची आत्महत्या महाराष्ट्रात होतआहेत. किटकनाशकामुळे शेतकरी जीवाला मुकत आहेत. यवतमाळ जिल्हा हा त्याचा केंद्रबिंदू आहे. या संदर्भात पंतप्रधान, केंद्रीय कृषीमंत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पत्रव्यवहार केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस सरते शेवटी यवतमाळला आले. असे पटोले यांनी सांगितले.
कर्ज, बोगस किटकनाशके, नकली बियाणे संदर्भात लोकसभेने संयुक्त समितीनियुक्ती करावी यासाठी सर्वपक्षीय नेत्यांशी आपण भेट घेत आहे.सरकार कोणत्याही पक्षाचे असले तरी चुकीच्या कारभाराबद्दललोकप्रतिनिधींनी बोललेच पाहिजे याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. तसेच जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी दारुसंदर्भात केलेल्या वक्तव्याचाही पटोले यांनी निषेध केला.
कर्जमाफीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी दिली चुकीची कबुली
राज्यसरकारकडून कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी शेतकऱ्यांकडून फॉर्म भरुन घेणे, आॅनलाईनअर्ज दाखल करणे यागोष्टी चुकीच्या पद्धतीने होत आहे, अशी टीका आपण केली होती. यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनीही कर्जमाफीची अंमलबजावणी करताना चुका झाल्याची कबुली दिली. असे पटोले यांनी सांगितले.
खुर्चीवर बसल्यावर भूमिका बदलतात
नोटबंदी व जीएसटीमुळे देशाचे नुकसान झाले आहे.नोटाबंदीनंतर जमा होणारे काळा पैसा, नकली नोटा कुठे आहेत?,नोटाबंदीत रांगेत उभारणारी ३०० नागरिक मरण पावले. नोटाबंदी वजीएसटी अंमलबजावणीवर आम्ही टीका केल्यानंतर केंद्र सरकार जीएसटीच्या दरात सुधारणा करत आहे. सरकारच्या चुकीच्या निर्णयावर आपल्यासह यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा, अरुण शौरी टीका करत आहेत. भाजपच्या संविधानातही लोकप्रतिनिधींची जी कर्तव्येआहेत त्यानुसार आम्ही सरकारच्या चुकांकडे लक्ष वेधत आहोते, असे पटोेले यांनी सांगितले.
राजू शेट्टींच्या आंदोलनात सहभागी होणार
शेतकऱ्यांच्या हितासाठी २० नोव्हेंबरला दिल्ली येथे खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलन पुकारले आहे. त्यामध्ये आपण सहभागी होणार असल्याचे सांगून भाजपचा नारा सात बारा कोरा, झाला नसल्याची टीकाही त्यांनी केली.