मुख्यमंत्री सुवर्णमध्य काढणार

By admin | Published: August 17, 2016 01:11 AM2016-08-17T01:11:55+5:302016-08-17T01:12:11+5:30

हद्दवाढचा प्रश्न : पालकमंत्री पाटील यांची माहिती; पोतडीतून काढतील योग्य प्रस्ताव

Chief Minister goes to the Golden Jubilee | मुख्यमंत्री सुवर्णमध्य काढणार

मुख्यमंत्री सुवर्णमध्य काढणार

Next

कोल्हापूर : राज्याचे मुख्यमंत्री हे ईश्वरी देणगी असणारे मुख्यमंत्री असल्याने ते सगळ््या अडचणींतून बाहेर पडतात. कोल्हापूरच्या हद्दवाढीच्या प्रश्नावरही ते सुवर्णमध्य काढणार आहेत. येत्या दोन-तीन दिवसांमध्ये ते एक चांगला प्रस्ताव आपल्या पोतडीतून काढतील, त्यामुळे हद्दवाढ समर्थक व हद्दवाढ विरोधक या दोघांसाठी हा निर्णय समाधानकारक असेल, असा आशावाद पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील सोमवारी येथे व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात शासकीय ध्वजारोहण सोहळा झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
कोल्हापुरात हद्दवाढीबाबत सध्या दोन्ही बाजूकडून आंदोलनाचा रेटा सुरु आहे त्यातून सरकार कसा मार्ग काढणार यासंबंधीची विचारणा पत्रकारांनी पालकमंत्री पाटील यांना केली होती. स्वत: पालकमंत्री हद्दवाढ व्हावी याच मताचे आहेत. त्यांनीच राजकीय इच्छाशक्ती दाखविल्याने गेली चार दशके भिजत पडलेला हा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे. गेल्याच महिन्यात हद्दवाढीची अधिसूचनाही मुख्यमंत्र्यांनी काढली होती परंतु हद्दवाढीस विरोध करणाऱ्या तिघा आमदारांच्या विरोधामुळे सरकारकडून त्या अधिसूचनेस स्थगिती देण्यात आली. सप्टेंबरपासून जिल्हा परिषद निवडणूकीची प्रक्रिया सुरु होत आहे. त्यामुळे हद्दवाढीचा जो कांही असेल तो निर्णय आता येत्या पंधरवड्यातच लागणार हे स्पष्टच आहे. विरोध झाला म्हणून मुख्यमंत्र्यांनी अधिसूचनेस स्थगिती दिली असली तरी आता तुमचे म्हणणे ऐकून घेतले आहे व आपण मेरिटवरच निर्णय घेत असल्याचे सांगून मुख्यमंत्री हद्दवाढीचा निर्णय घेण्याची शक्यता बळावली आहे. त्याचेच सुतोवाच पालकमंत्र्यांनी केले असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. कन्यागत पर्ववेळी आलेल्या धमकीच्या पत्राबद्दल बोलताना मंत्री पाटील म्हणाले, ‘देश दिवसेंदिवस प्रगती करत आहे. त्यामुळे लोकशाहीला धोका निर्माण करण्यासाठी व प्रगतीला खीळ पाडण्यासाठी आजूबाजूचे देश असे कांही उद्योग करणार हे गृहीत आहे म्हणून अशा प्रकारांच्या धमक्यांना मी विशेष महत्व देत नाही. पण त्यांची काळजी घेणे हे महत्त्वाचे आहे. कन्यागत पर्वसाठी येणाऱ्या भाविकांनी आवाहन आहे की, कोणतीही चुकीची गोष्ट वाटल्यास तत्काळ प्रशासनाला कळवा.’ ‘महसूल सप्ताहा’मधून आतापर्यंत लाखांहून अधिक महिलांचे नाव सात-बारा पत्रकास लावण्यात आले. या महिलांना शेतीविषयक माहिती आणि मार्गदर्शन करण्यासाठी ‘महसूल सप्ताहा’ची व्याप्ती वाढवून तो ‘महसूल पंधरवडा’ करण्यात आल्याची माहिती पाटील यांनी दिली.


पडीक जमीन परत करणार
मंत्री पाटील म्हणाले, ‘महसूल विभागाचे ब्रिटिशकालीन कायदे आवश्यकतेनुसार बदल करण्याची कार्यवाही करण्यास
राज्य शासनाने प्राधान्य दिले असून
यासाठी या क्षेत्रातील जुन्या कायद्यांचा अभ्यास आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले जाणार आहे. याबरोबरच पडीक जमीन मालकांना परत करण्याचा क्रांतिकारी निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.’

Web Title: Chief Minister goes to the Golden Jubilee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.