मुख्यमंत्री आज कोल्हापुरात
By Admin | Published: February 7, 2016 12:57 AM2016-02-07T00:57:35+5:302016-02-07T00:57:35+5:30
न्यायसंकुलाच्या इमारतीचे उद्घाटन व टोलविरोधी कृती समितीतर्फे आयोजित सत्कार समारंभा
कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज, रविवारी जिल्हा दौऱ्यावर येत असून ते न्यायसंकुलाच्या इमारतीचे उद्घाटन व टोलविरोधी कृती समितीतर्फे आयोजित सत्कार समारंभाला उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे व अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकरही जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
सकाळी १०.५० वा. मुख्यमंत्र्यांचे कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व मोटारीने कसबा बावडा रोडकडे प्रयाण होणार आहे. सकाळी ११ वाजता ते येथील कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन समारंभास उपस्थित राहणार आहेत. दुपारी १२.२५ वा. रेसिडेन्सी क्लब, ताराबाई पार्क येथे आगमन होईल. यानंतर १२.५५ वाजता रेसिडेन्सी क्लब येथून ते प्रायव्हेट हायस्कूल येथे आयोजित कोल्हापूर शहर व जिल्हा सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीतर्फे जाहीर सत्कार समारंभास उपस्थित राहणार आहेत. दुपारी २.२० वाजता समारंभानंतर ते मोटारीने कोल्हापूर विमानतळाकडे रवाना होतील. तेथून विमानाने मुंबईकडे प्रयाण करणार आहेत.
सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे हेही आज दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम हा मुख्यमंत्र्यांसोबतच आहे.
अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर सकाळी ८.३० वाजता आंबोली (ता. सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग) येथून मोटारीने आजरा येथून येणार आहेत. सकाळी ९.३० वाजता त्यांचे शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल. १० वाजता अण्णा-भाऊ सांस्कृतिक हॉल, आजरा हायस्कूल येथे वैश्यवाणी समाजातर्फे आयोजित वधू-वर मेळावा कार्यक्रमास उपस्थिती राहणार आहे. यानंतर ११ वाजता ते मोटारीने गोव्याकडे जाणार आहेत.