मुख्यमंत्री, उद्धव हेच भ्रष्टाचाराला जबाबदार
By Admin | Published: February 17, 2017 11:44 PM2017-02-17T23:44:51+5:302017-02-17T23:44:51+5:30
नारायण राणेंचा घणाघात : पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषदेवर भ्रष्टाचाराचे आरोप का?
कुडाळ : उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस हेच भ्रष्टाचाराला जबाबदार आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात एवढा फेकाडा मुख्यमंत्री आपण पाहिला नाही. माझ्या लोकप्रतिनिधींना चोर म्हणणाऱ्या या चोरांना सोडणार नाही, असा इशारा देतानाच सेना-भाजपकडे पुरेसे उमेदवार नाहीत, ते आमच्याशी काय लढणार? असा प्रश्न उपस्थित करत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सेना भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले.
मुंबई महापालिका निवडणुकीत एकमेकांवर चिखलफेक करणारे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे भ्रष्टाचाराला तेवढेच जबाबदार आहेत. त्यामुळे भ्रष्टाचारासाठी त्यांनी एकमेकांवर बोट दाखविणे थांबवावे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुडाळ येथील नवीन एस.टी. डेपो मैदानावर शुक्रवारी सायंकाळी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्यावतीने जाहीर प्रचार सभा झाली.
या प्रचार सभेचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार नीतेश राणे, माजी खासदार नीलेश राणे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, महिला जिल्हाध्यक्ष प्रणिता पाताडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित देसाई, उपजिल्हाध्यक्ष अशोक सावंत, सुनील भोगटे, कुडाळ तालुका काँग्रेस अध्यक्ष दिनेश साळगावकर, कुडाळचे नगराध्यक्ष विनायक राणे, सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब, वैभववाडी तालुकाध्यक्ष भालचंद्र्र साठे, युवक काँग्रेसचे लोकसभा मतदार संघाचे अध्यक्ष आनंद शिरवलकर, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष विकास कुडाळकर, दीपलक्ष्मी पडते, राकेश कांदे, सुदन बांदिवडेकर, डॉ. जयेंद्र्र परूळेकर, अस्मिता बांदेकर, भाके वारंग, संदीप कदम, विशाल परब, काँग्रेसचे जिल्हा परिषद व पंचायत समितीचे जिल्ह्यातील सर्व उमेदवार पक्षाचे जिल्हा आणि तालुका पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी टीका करताना राणे म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी माझ्याच जिल्ह्यात येऊन माझ्यावरच बोलण्याची हिम्मत करू नये. लोक त्यांना जुमानणार नाहीत. रविंद्र चव्हाणांसारखे मंत्री आमच्याकडे यात्रेत फिरतात. नगरपालिकेसाठी जिल्'ात फिरलेल्या चव्हाणांना केवळ कुडाळात आणि सावंतवाडी एकच उमेदवार निवडून आणता.
वस्त्रहरण
त्यांनी बघावे की राणेंची सभा लागते तेव्हा खुर्च्या कमी पडतात. वस्त्रहरण करण्यासाठी सत्ताधाऱ्यांची अवस्था पाहून त्यांच्याकडे वस्त्रच नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे यांचे वस्त्रहरण कसे करणार, असा टोला त्यांनी युती सरकारला लगावला.
मुख्यमंत्र्यांच्या सभेतील रिकाम्या खुर्च्या म्हणजे..
नीतेश राणे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत आपण खुर्च्या मोजत नव्हतो; तर भाजपत गेलेल्यांची राजकीय लायकी जनतेला दाखवित होतो. पंतप्रधानांना आणून देखील भाजपचा विधानसभेत पराभव झाला.