चंदूरमधील अरुण सेवा सोसायटीमार्फत ७५ हजारांची मुख्यमंत्री सहायता निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:23 AM2021-05-14T04:23:30+5:302021-05-14T04:23:30+5:30

इचलकरंजी : चंदूर (ता. हातकणंगले) येथील अरुण सेवा सोसायटीमार्फत कोविडसाठी ७५ हजार रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देणार ...

Chief Minister's Assistance Fund of Rs. 75,000 through Arun Seva Society in Chandur | चंदूरमधील अरुण सेवा सोसायटीमार्फत ७५ हजारांची मुख्यमंत्री सहायता निधी

चंदूरमधील अरुण सेवा सोसायटीमार्फत ७५ हजारांची मुख्यमंत्री सहायता निधी

Next

इचलकरंजी : चंदूर (ता. हातकणंगले) येथील अरुण सेवा सोसायटीमार्फत कोविडसाठी ७५ हजार रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देणार असल्याचे संस्थेचे मार्गदर्शक रघुनाथ पाटील यांनी जाहीर केले. यावेळी आरोग्य विभागाच्या आशा वर्कर्स व ग्रामपंचायत सफाई कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी रघुनाथ पाटील म्हणाले, आशा वर्कर्स आपला जीव धोक्यात घालून काम करीत असून, त्यांना सोसायटीच्या संचालकांनी प्रत्येकी एक हजार रुपये देत त्यांच्या कामाचा गौरव केला आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना प्रत्येकी पाचशे रुपयांची मदत फौंडेशनकडून शिवराज पाटील यांनी दिली. यावेळी प्रकाश पाटील, माजी सरपंच विजय पाटील, माणिक पाटील, ग्रामविकास अधिकारी बी. व्ही. कांबळे, तलाठी सीमा धुत्रे, प्रभाकर पाटील, रायगोंडा पाटील, अ‍ॅड. बाबासाहेब सूर्यवंशी, पिंटू जाधव, राहुल वाघमोडे, भगवान पुजारी, संजय घोरपडे, संजय पाटील, आदी उपस्थित होते.

फोटो ओळी

१३०५२०२१-आयसीएच-०३

चंदूर (ता. हातकणंगले) येथील अरुण सोसायटीने विविध घटकांना मदत दिली.

Web Title: Chief Minister's Assistance Fund of Rs. 75,000 through Arun Seva Society in Chandur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.