मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनाही अजून हवेतच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 11:57 PM2019-04-29T23:57:56+5:302019-04-29T23:58:01+5:30
विश्वास पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : लघु दाब, उच्च दाब वितरणप्रणाली व त्यानंतर मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनांचा ...
विश्वास पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : लघु दाब, उच्च दाब वितरणप्रणाली व त्यानंतर मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनांचा धडाका महावितरणने लावला खरा, परंतु या योजनेतून प्रत्यक्षात कनेक्शन मिळताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येत आहे. सौरकृषी पंप योजनेतून नुसते अर्ज भरून घेण्यात आले असून, अजून एकही कनेक्शन या योजनेतून सुरूझाले नसल्याचे कोल्हापूर - सांगली जिल्ह्यातील चित्र आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात नदीत पाणी आहे; परंतु ते कृषिपंप नसल्याने पिकाला देता येत नसल्याचे चित्र आहे. ३१ मार्च २०१८ अखेर कोल्हापूर जिल्ह्यात ८४४२, तर सांगली जिल्ह्यात १६४१७ शेतकऱ्यांनी पैसे भरले आहेत. हे पैसे २०१४ पासून भरले आहेत; परंतु शेतकºयांना कनेक्शन मिळालेले नाही. शेतकºयांनी पैसे भरूनही त्यांना वीज कनेक्शन देता येत नाही म्हणून महावितरण कंपनीने गाजावाजा करून उच्चदाब वितरण प्रणालीतून (एचव्हीडीएस) तातडीने कनेक्शन देणार, असे जाहीर केले.
मार्च २०१८ चा बेस धरून ज्या शेतकºयांनी पैसे भरले आहेत, परंतु त्यांना कनेक्शन देता आलेले नाही, अशांना जुन्याच पारंपरिक योजनेतून म्हणजे लघुदाब वाहिनींवरून कनेक्शन देण्यात आलीत.
कोल्हापूर-सांगली जिल्ह्यात जे पैसे भरून प्रतीक्षा यादीत शेतकरी होते, त्यांच्यासाठी उच्चदाब वाहिनीतून तातडीने कनेक्शन देणार, असे जाहीर केले; त्यासाठी १०,१६ आणि २५ केव्हीए क्षमतेचे व्यक्तिगत डीपी बसवून देण्यात येणार होते; परंतु त्यासाठी नवीन रोहित्रे उपलब्ध झाली नाहीत आणि खासगी निविदेला मार्जिन कमी असल्याच्या कारणावरून ठेकेदारांनी सुरुवातीला प्रतिसाद दिला नाही; त्यामुळे या दोन जिल्ह्यात जे २४८५९ प्रलंबित कनेक्शन्स होती, त्यातील उच्चदाब प्रणालीतून फक्त ३१६ कनेक्शन्स देण्यात आली आहेत.
विधिमंडळातील आश्वासनालाही हरताळ
पश्चिम महाराष्ट्रातील पेड पेंडिंग वीज कनेक्शन्सचा विषय आमदार सतेज पाटील, आमदार चंद्रदीप नरके यांनी विधिमंडळात उपस्थित केला होता. त्यावेळी सरकारने ही कनेक्शन्स मार्च २०१९ पर्यंत देण्याचे आश्वासन सभागृहात दिले होते; परंतु प्रत्यक्षात त्या आश्वासनालाही हरताळ फासला गेला आहे.
पैसे भरून कनेक्शन न मिळालेली शेतकरी
(१५ एप्रिल २०१९ अखेर)
कोल्हापूर : ५०६०
सांगली : १०७२५
उच्चदाब प्रणालीतील कनेक्शन्स
कोल्हापूर : १२९
सांगली : १८७
दोन्ही जिल्ह्यातील प्रोसेसमध्ये असलेली प्रकरणे : ६००
कोल्हापूर सांगली
अर्ज प्राप्त २३४८ १२६१
अर्ज बाद १४१४ ७८३
कोटेशन दिले ३५० १०५
कोटेशन भरून घेतले २०५ ७२
वर्क आॅर्डर : १९२ ७०
प्रत्यक्षात कनेक्शन : एकही नाही
युती सरकारमधील मंत्र्यांच्या मनांत पश्चिम महाराष्ट्राबद्दल आकस असल्यानेच या भागातील शेतकºयांच्या वीज कनेक्शन्सबद्दल सरकार काहीच करायला तयार नसल्याचा अनुभव आम्ही चार वर्षे घेत आहोत. शेतकºयांचे शिष्टमंडळ घेऊन दोन दिवसांत मुख्य अभियंत्यांना जाब विचारणार आहोत.
- विक्रांत पाटील- किणीकर, कोल्हापूर जिल्हा इरिगेशन फेडरेशन