चिकोत्रावरील उपसाबंदीचे अग्निदिव्य पाणी गुरूवारी सोडणार : तारेवरची कसरत करावी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 12:37 AM2018-04-11T00:37:07+5:302018-04-11T00:37:07+5:30

Chikotra fireworks fire on Thursday to leave: Star must be exercised | चिकोत्रावरील उपसाबंदीचे अग्निदिव्य पाणी गुरूवारी सोडणार : तारेवरची कसरत करावी लागणार

चिकोत्रावरील उपसाबंदीचे अग्निदिव्य पाणी गुरूवारी सोडणार : तारेवरची कसरत करावी लागणार

Next
ठळक मुद्देपाटबंधारे विभागाला पाणीपुरवठा करताना

दत्तात्रय पाटील।
म्हाकवे : झुलपेवाडी धरणातून उद्या, गुरुवारी चिकोत्रा नदीमध्ये सहावे आवर्तन देण्याच्या दृष्टीने पाटबंधारे विभागाने तयारी केली आहे. परंतु, धरणातील उपलब्ध पाणीसाठा आणि पाण्याची वाढती मागणी पाहता पाटबंधारेला पाणीपुरवठा करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. सध्या, ४२५ एमसीएफटी इतका पाणीसाठा असून, शेतीसह पिण्यासाठी दोन आणि जूनमध्ये केवळ पिण्यासाठी एक आणि पावसाने ओढ दिल्यास आणखी एक आवर्तन देण्याचे नियोजन आहे. मात्र, उद्या सोडण्यात येणाऱ्या आवर्तनावर पुढील पाण्याचे नियोजन अवलंबून आहे. त्यामुळे अवैध पाणी उपसा रोखण्याचे अग्निदिव्य पाटबंधारेसह वीजवितरणच्या अधिकाऱ्यांना पार करावे लागणार आहे.

चिकोत्रा (झुलपेवाडी) धरणात यंदा केवळ ९४० एमसीएफटी (६२%) इतका अल्प पाणीसाठा झाला. या अत्यल्प पाणीसाठ्यावर चिकोत्रा खोºयातील ३५ गावांतील शेतीसह नागरिक अवलंबून आहेत. उपलब्ध पाणीसाठ्यातून शेतीसह पिण्यासाठी आठ आवर्तने देण्याचे नियोजन केले होते. मात्र, पहिल्या चार ते पाच आवर्तनापर्यंत मोठ्या प्रमाणात पाणी उपसा झाल्याने अंतिम टप्प्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सध्या, चिकोत्रा खोºयात पाणीटंचाईचे ढग गडद होत आहेत.

धरणात उपलब्ध पाणी पाहता ७०० एकर बागायती क्षेत्र असणे आवश्यक असताना येथील शेतकºयांनी तब्बल सुमारे २१०० एकर इतक्या मोठ्या प्रमाणात उसाचे पीक घेतले. तसेच, नदीमध्ये पाणी साठ्यासाठी मोठमोठे खड्डे काढण्यात आले. तसेच, वाळू उपसाही मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे. परिणामी, नदीत सोडण्यात येणारे पाणी शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहचण्यासाठी जादा वेळ लागत आहे. दरम्यान, १२ ते २१ एप्रिल या कालावधीत चिकोत्रा नदीकाठावर उपसाबंदीचा आदेश काढून पाटबंधारे विभागाने नदीमध्ये पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

...तर पुढील पाणी बरगे काढूनच
उद्या, गुरूवारी सोडण्यात येणारे आवर्तन हे १२५ ते १३० एमसीएफटी पाण्यात पूर्ण होणे गरजेचे आहे. यासाठी उपसाबंदी आदेशाचे पालन होण्यासाठी शेतकºयांसह नदीकाठावरील ग्रामपंचायत पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी पाटबंधारे व वीजवितरण अधिकाºयांना सहकार्य करणे गरजेचे आहे. वाढत्या उन्हासह अवैध पाणी उपसामुळे या नदीवरील शेवटच्या बंधाºयापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाणार आहे. याचा थेट परिणाम पुढील आवर्तनावर होणार असून, पुढील पाणी सर्वच बंधाºयांचे बरगे काढून सोडावे लागणार असल्याचे स्पष्ट निर्देश पाटबंधारेच्या अधिकाºयांनी दिले आहेत.

आतातरी डोळे उघडणार काय ?
चिकोत्रा खोऱ्यात पाणीटंचाईची जाणीव असणाºया आणि उपसाबंदीतही शेतीला पाणी देण्यासाठी बड्या शेतकºयांनी कमी पाणीपरवाना असताना जादा क्षमतेच्या विद्युतमोटारी, सिंगल फेजवर चालणाºया मोटारी बसवून पाणी उपसा केला. आता या क्लुप्त्याची माहिती प्रशासनापर्यंत आली आहे. त्यामुळे आता याबाबत ठोस पावले उचलून कारवाई होणार का? की ये रे माझ्या मागल्या.. हाच कित्ता अधिकाºयांकडून गिरवला जाणार, असा सवाल चिकोत्राच्या शेवटच्या टोकावरील गावकºयांतून उपस्थित होत आहे.

Web Title: Chikotra fireworks fire on Thursday to leave: Star must be exercised

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.