चिकोत्रा तिसऱ्यांदा भरणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 12:01 AM2018-08-29T00:01:10+5:302018-08-29T00:01:15+5:30
रवींद्र येसादे।
लोकमत न्यूज नेटवर्क
उत्तूर : १९९७ मध्ये आजरा तालुक्यातील झुलपेवाडी येथे बांधण्यात आलेला चिकोत्रा पाटबंधारे प्रकल्प तिसºयांदा भरण्याची शक्यता असून, चिकोत्राने नव्वदीचा टप्पा पार केला आहे. धरणक्षेत्रात पाऊस पडत असल्याने प्रकल्पातून पाणी सोडण्याचे नियोजन पाटबंधारे खात्याने केले आहे.
म्हातारीच्या पठारावरून येणारे पाणी व १५ जूनपासून सतत पडणाºया पावसामुळे पाणीसाठ्यात दिवसागणिक वाढ होत आहे. सन २००५, २००७ यावेळी प्रकल्प भरल्याने सांडव्यातून पाणी सोडण्यात आले. २००७ नंतर यंदा प्रकल्प भरण्याच्या तयारीत आहे. सततच्या पावसामुळे म्हातारीच्या पठारावरून मोठ्या प्रमाणात चिकोत्राकडे पाणी येत
आहे. त्यामुळे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तब्बल दहा वर्षांनंतर चिकोत्रामध्ये ८५ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा होत असल्याने बुडीत व लाभक्षेत्रातील शेतकरी सुखावला आहे. आता दरबर्षी पाणीसाठा ४५ टक्क्यांपर्यंत होत होता. मात्र, यंदा प्रकल्प नव्वदी पार करेल अंदा अंदाज बांधला जात आहे.
दहा वर्षांनी दरवाजांची डागडुजी
प्रकल्प पूर्ण भरण्यासाठी दरवाजाजवळ पाणी येण्यासाठी सात फूट कमी आहे. सध्या ६५०.४०. द.ल.घ.फूट पाणी आहे. पाण्याचा प्रवाह प्रकल्पात वाढला असल्याने प्रकल्प भरणार आहे.
पाणी कोठून सोडायचे याबाबत विचार सुरू आहे. दरवाजांची डागडुजी केली आहे. मुख्य गेट किंवा दरवाजामधून पाणी सोडण्यात येणार आहे. मुख्य गेटमधून पाणी सोडल्यास वीज निर्मिती होणार आहे.
चार कर्मचारी...
पण हजर दोनच...!
प्रकल्पाच्या देखभालीसाठी चार कर्मचाºयांची पाटबंधारे विभागाने नियुक्ती केली आहे. त्यापैकी दोघे सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असल्याने रजेवर आहेत. त्यामुळे प्रकल्पाची देखभाल दोघांच्यावरच आहे.
प्रकल्पावर वाहनांना बंदी
सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून प्रकल्पावर नेहमी ये-जा करणारी वाहने प्रकल्पावर अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रवेशद्वारावरच अडविण्यात आली आहेत. प्रकल्प भरत असल्याने कापशी खोºयातील पर्यटकांची गर्दी होत आहे.