कोल्हापुरात बाळ-बाळंतिणीचा मृत्यू

By admin | Published: May 29, 2017 04:17 AM2017-05-29T04:17:45+5:302017-05-29T04:17:45+5:30

कसबा बावडा येथे प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेचा डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याच्या संशयातून नातेवाइकांनी

Child and child mortality in Kolhapur | कोल्हापुरात बाळ-बाळंतिणीचा मृत्यू

कोल्हापुरात बाळ-बाळंतिणीचा मृत्यू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कसबा बावडा येथे प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेचा डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याच्या संशयातून नातेवाइकांनी गोंधळ घातला. सुप्रिया तराळ असे मृत विवाहितेचे नाव आहे. संतप्त नातेवाइकांनी रुग्णालयात घुसून डॉ. नितीन पाटील व पत्नी डॉ. रश्मी या दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. सुप्रिया प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर डॉ. पाटील यांनी नैसर्गिक प्रसूतीसाठी वाट बघण्यास सांगितले. मात्र, कळा असह्य झाल्याने नातेवाइकांनी शस्त्रक्रिया करण्यास सांगितले. त्यानुसार शनिवारी शस्त्रक्रिया सुरू असताना बाळंतिणीचा व बाळाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

सुप्रियाचा मृत्यू नेमका कसा झाला आहे, ते शवविच्छेदन अहवालावरून स्पष्ट होईल. त्यामध्ये डॉक्टर दोषी आढळल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल. सध्या तरी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.
- प्रवीण चौगुले, पोलीस निरीक्षक, शाहूपुरी पोलीस ठाणे

ंआमच्या रुग्णालयात दाखल झालेल्या सुप्रिया तराळ या विवाहितेचा प्रसूतीदरम्यान हृदयविकाराचा धक्का आल्याने मृत्यू झाला आहे. आमच्याकडून कोणत्याही प्रकारे हलगर्जीपणा झालेला नाही.
- डॉ. नितीन पाटील, डॉक्टर

Web Title: Child and child mortality in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.