बाल मंच सदस्यांची ‘फूल टू धमाल’

By admin | Published: September 14, 2015 12:13 AM2015-09-14T00:13:09+5:302015-09-14T00:18:20+5:30

लोकमत बाल विकास मंचतर्फे आयोजन : पाच हजार पाल्य, पालकांसाठी रविवारची सुटी अविस्मरणीय

Child forum members 'flower to crematorium' | बाल मंच सदस्यांची ‘फूल टू धमाल’

बाल मंच सदस्यांची ‘फूल टू धमाल’

Next

कोल्हापूर : अंगावर शहारे आणणारी शिवकालीन युद्धकलांची चित्तथरारक प्रात्यक्षिके... सूर-पारंब्याने जागलेल्या बालपणीच्या आठवणी... फॅशन शो... उखाणे....आणि मनातील गाणी... अशा उत्साही वातावरणात रविवारी दुपारी ‘लोकमत बाल विकास मंच’चे सदस्य व त्यांच्या पालकांनी ‘फूल टू धमाल’ उडवून दिली. निमित्त होते, ड्रीमवर्ल्ड येथे आयोजित ‘फन फेअर’चे. त्याची मजा लुटणाऱ्या सुमारे पाच हजार पाल्य व पालकांसाठी रविवारची सुटी अविस्मरणीयच ठरली.
मनोरंजनातून शालेय विद्यार्थ्यांच्या कला-गुणांचा विकास साधणाऱ्या आणि बालमनाचा सच्चा सवंगडी असलेल्या ‘लोकमत बाल विकास मंच’च्या सन २०१५-१६ च्या सदस्यांसाठी या ‘फन फेअर’चे मोफत आयोजन करण्यात आले होते.
ड्रीमवर्ल्डच्या सभागृहात या ‘फन फेअर’चे उद्घाटन ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमा पूजनाने आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आले. याप्रसंगी ड्रीमवर्ल्डचे व्यवस्थापक पी. नायडू, महावीर इंग्लिश स्कूलच्या प्रायमरी विभागप्रमुख धनश्री व्हनागडे, सखी मंच कमिटी मेंबर स्मिता ओतारी, गीता जरग, दिप्ती सासने यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. दरम्यान, ‘कोणतेही खेळ मनसोक्त खेळा’ अशी परवानगी मिळताच मुले सर्वप्रकारच्या खेळांमध्ये भान हरपून दंग झाली. याठिकाणी असलेला मोठा लोखंडी व ब्रेकडान्स पाळणा, जंपिंग बलून, विमानाची प्रतिकृती, व्होरटेक्स, क्रॉस पाळणा, चाँद-तारा, टोरा-टोरा अशा खेळण्यांचा मुलांनी मनसोक्त आनंद लुटला. घोडेस्वारी करण्यासाठी बालकांनी एकच गर्दी केली होती. दुसऱ्या बाजूला सभागृहात विविध गेम शोचे आयोजन केले होते. येथे जनरल नॉलेजवरील प्रश्न, उखाणे अशा विविध गेम शोने सर्वांनाच पोट धरून हसायला लावले. प्रत्येक शोनंतर टाळ्या, ‘वन्स मोअर’ची मागणी, स्टेजवर येण्यासाठी बालचमूच्या धावपळीमुळे कलाकारांनाही हुरूप येत होता. येथे मुलांसह पालकांनाही विविध गेम खेळण्याचा मोह आवरत नव्हता. मुलांसोबत पालकांनीही झोपाळ््यावर बसणे, सूरपारंब्या खेळून लहानपणाच्या दिवसांना उजाळा दिला. ड्रीमवर्ल्ड येथे दुपारी तीन वाजता सुरू झालेली ही धमाल सुमारे चार तास सुरू होती. (प्रतिनिधी)

Web Title: Child forum members 'flower to crematorium'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.