कमी खर्चात बालरोगतज्ज्ञांनी नवजात अर्भकांना सेवा देणे गरजेचे : अभय बंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 01:52 PM2017-10-09T13:52:11+5:302017-10-09T14:01:26+5:30

बालरोगतज्ज्ञांनी अत्यंत कमी खर्चात नवजात अर्भकांना घरपोच सेवा देणे गरजेचे आहे. यासाठी त्यांनी स्थानिक आरोग्य कर्मचाºयांची मदत घ्यावी, असे प्रतिपादन समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी येथे केले.

Child laborers need to provide services to infant babies at low cost: Abhay Bang | कमी खर्चात बालरोगतज्ज्ञांनी नवजात अर्भकांना सेवा देणे गरजेचे : अभय बंग

कमी खर्चात बालरोगतज्ज्ञांनी नवजात अर्भकांना सेवा देणे गरजेचे : अभय बंग

googlenewsNext
ठळक मुद्देराज्यस्तरीय महानिओकॉन परिषदेचा समारोपडॉ. बंग यांचा वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल मानपत्र देवून गौरव

कोल्हापूर : बालरोगतज्ज्ञांनी अत्यंत कमी खर्चात नवजात अर्भकांना घरपोच सेवा देणे गरजेचे आहे. यासाठी त्यांनी स्थानिक आरोग्य कर्मचाºयांची मदत घ्यावी, असे प्रतिपादन समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी रविवारी येथे केले.


कोल्हापूर अकॅडमी आॅफ पेडिअ‍ॅट्रिक या संघटनेतर्फे आयोजित १४ व्या महाराष्ट्र राज्य नवजात अर्भकतज्ज्ञ परिषदेच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमात समाजसेवक डॉ. बंग यांचा वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल मानपत्र देवून गौरविण्यात आले.

डॉ. बंग म्हणाले, अर्भकाचा मृत्यूदर कमी करण्यासाठी बालरोगतज्ज्ञांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या योगदानामुळे अर्भक मृत्यूदर कमी होण्यास मदत होईल.

या कार्यक्रमात कोल्हापूर अकॅडमी आॅफ पेडिअ‍ॅट्रिक संघटनेच्या अध्यक्षा डॉ. निवेदिता पाटील यांच्या हस्ते डॉ. बंग यांना मानपत्र देवून गौरविण्यात आले. महानिओकॉन २०१७ च्या कार्यकारिणीतर्फे अध्यक्ष डॉ. अशोक चौगुले यांच्या हस्ते करवीरनिवासिनी अंबाबाईची मूर्ती, शाल, श्रीफळ देवून डॉ. बंग यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी संघटनेचे सचिव डॉ. विजय गावडे, खजिनदार डॉ. अमित चव्हाण, परिषदेचे सचिव डॉ. अमोल गिरवलकर, राहूल शिंदे, उदय पाटील, आदी उपस्थित होते. दरम्यान, या परिषदेच्या दुसºया दिवशी नवजात अर्भकामधील हृदयाचे आजार, अंर्तस्त्रावी ग्रंथीचे आजार श्वसन संस्थेचे आजार मातेच्या दुधाची दुग्धपेढी अशा विविध विषयांवर डॉ. जयश्री मोंडकर, प्रशांत दीक्षित, सचिन शहा, तुषार परीख, शिला मधाई, वामन खाडीलकर, हेमंत जोशी यांनी मार्गदर्शन केले.

आकडेवारीसह मार्गदर्शन

या कार्यक्रमात डॉ. बंग यांनी गडचिरोली भागात नवजात अर्भक मृत्यू कमी करण्यात आल्याची आकडेवारी सादर केली. अत्यंत कमी खर्चामध्ये स्थानिक आरोग्य कर्मचाºयांच्या मदतीने नवजात अर्भकांना घरपोच सेवा देऊन मृत्यू कसे कमी केले याचे सादरीकरण केले. बालमृत्यू कमी करण्यात बालरोगतज्ज्ञ कशी मोलाची कामगिरी करु शकतात याबाबत मार्गदर्शन केले.

 

 

 

 

 

 

Web Title: Child laborers need to provide services to infant babies at low cost: Abhay Bang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.