बिंदू चौकात मुलांचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:26 AM2021-09-27T04:26:56+5:302021-09-27T04:26:56+5:30

कोल्हापूर : जगभर सुरू असलेल्या मुलांच्या पर्यावरण जागृती मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी रविवारी सायंकाळी बिंदू चाैकात कोल्हापुरातील ८ ते १८ ...

Children's awakening in Bindu Chowk | बिंदू चौकात मुलांचा जागर

बिंदू चौकात मुलांचा जागर

Next

कोल्हापूर : जगभर सुरू असलेल्या मुलांच्या पर्यावरण जागृती मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी रविवारी सायंकाळी बिंदू चाैकात कोल्हापुरातील ८ ते १८ वयोगटांतील मुलांनी जनतेसमोर आपली भूमिका मांडली. या कार्यक्रमाचे आयोजन वृक्षप्रेमी वेल्फेअर ऑर्गनायझेशन, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर राॅयल्स, स्वयंप्रभा मंच, कोल्हापूर अर्थ वारियर्स, एव्हरी डे फाॅर फ्युचर या संस्थांनी केले होते.

या कार्यक्रमात मुलांनी युनिसेफच्या अहवालानुसार ८५ कोटी मुले वणवे, ढगफुटी, चक्रीवादळे, अशा अनेक संकटांनी घेरली आहेत. ग्लोबल वार्मिंग तीव्रता कशी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. जगात पर्यावरणविषयक जनजागृती करण्यासाठी मुले व तरुण एकवटली आहेत. याबद्दल अनेक लहान मुलांनी, व्यवस्था बदल हाच एकमेव पर्याय पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे मत मांडले. मुलांच्या हातातील पर्यावरणविषयक फलक सर्वांचे लक्ष वेधून घेणारे होते.

फोटो : २६०९२०२१-कोल-बिंदु चौक

ओळी : वृक्षप्रेमी वेल्फेअर ऑर्गनायझेशनसह विविध संस्थांच्यावतीने रविवारी जागतिक पर्यावरण जनजागृती अभियानास पाठिंबा दर्शविण्यासाठी लहानग्यांनी बिंदू चौकात अशी फलकाद्वारे व आपले मत मांडून जनजागृती केली.

Web Title: Children's awakening in Bindu Chowk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.