मुलांची धूमस्टाईल; पालकांवर गुन्हा
By admin | Published: April 30, 2017 01:20 AM2017-04-30T01:20:50+5:302017-04-30T01:20:50+5:30
विश्वास नांगरे-पाटील : मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविणार; परिक्षेत्रात ५० हजार ३७९ वाहनांवर कारवाई
कोल्हापूर : अज्ञान मुलांच्या ‘धूम स्टाईल’च्या हौसेपुढे त्यांच्यासह पादचाऱ्यांच्या जिवालाही धोका पोहोचत आहे. त्यामुळे अठरा वर्षांखालील मुले गाडी चालविताना सापडल्यास दंड होईलच; त्याशिवाय त्यांच्याकडून झालेल्या अपघातात कुणाचा मृत्यू झाल्यास पालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश परिक्षेत्रातील पोलिस अधीक्षकांना दिले आहेत, अशी माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी शनिवारी दिली.
परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण या पाच जिल्ह्णांत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५० हजार ३७९ वाहनांवर कारवाई करून १ कोटी १० लाख ३१ हजार १२० रुपये दंड वसूल केला. अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी पोलिस प्रशासनाने सोमवार दि. १७ ते १८ व सोमवार दि. २४ व २५ एप्रिल हे चार दिवस ही मोहीम राबवली आहे.
यावेळी विश्वास नांगरे-पाटील म्हणाले, वाहनांची संख्या वाढल्याने पाचही जिल्ह्णांतील शहरासह इतर पर्यटनस्थळी वाहतुकीची कोंडी होत आहे. काही वाहनधारक नियमबाह्णपणे वाहने चालवून वाहतुकीस अडथळा निर्माण करीत असल्याचे निदर्शनास आले होते. गेल्या तीन वर्षांत अपघाती मृतांची संख्या जास्त आहे. नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, यासाठी परिक्षेत्रातील पाच जिल्ह्णांत बेफिकीर वाहनचालकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार दि. १७ ते १८ व २४ ते २५ एप्रिल या चार दिवसांत पोलिस रस्त्यावर उतरले. प्रत्येक दुचाकी, चारचाकी वाहने तपासली. यावेळी परवाना नसणे, फिल्मिंग काचा, झेब्रा क्रॉसिंगवर, स्टॉप लाईनवर वाहन उभे करणे, डावी लेन मोकळी न ठेवणे, सिग्नलच्या नियमांचे उल्लंघन करणे, एकेरी मार्गावर वाहन चालविणे, ट्रिपल सीट, फॅशनेबल नंबरप्लेट, मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली. कागदपत्रांची पाहणी करून नियमबाह्ण वाहनचालकांना जाग्यावर २०० ते ५०० रुपये दंडाची पावती दिली गेली. बहुतांश पाच जिल्ह्णांमध्ये सर्वाधिक कारवाई वाहन चालविण्याचा परवाना (लायसेन्स) नसणाऱ्यांवर झाली. ही कारवाई येथून पुढे आठवड्यातील कोणतेही दोन दिवस निवडून केली जाणार आहे.
परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्णांत वाहनांची रहदारी वाढल्यामुळे अनेक मार्गांवरील वाहतुकीचा प्रश्न गंभीर होत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पार्किंग नसतानाही वाहने अस्ताव्यस्त उभी केली जातात. त्यामुळे वाहनधारकाला समोरच्या वाहनाला ओलांडून जाताना अपघाताला सामोरे जावे लागते. वाहन चालविताना मोबाईलवर बोलत जाणे ह ‘स्टाईल’च बनली आहे. त्याचा परिणाम म्हणून अपघाती मृत्यूंचे प्रमाण वाढत आहे. अज्ञान मुलांच्या हातात दुचाकी दिल्याने अनेक पादचाऱ्यांचे जीव धोक्यात आले आहेत. मुलांनी केलेल्या अपघातातील मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या त्यांच््या पालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार असल्याचे नांगरे-पाटील यांनी सांगितले.
चालकांची तपासणी
पुणे-बंगलोर महामार्गावर ट्रकचालक मद्यपान, नशिल्या पदार्थांचे सेवन करून वाहने चालवीत असतात. त्यामुळे महामार्गावर अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हे रोखण्यासाठी विशेष पथके नियुक्त करून प्रत्येक वाहनचालकाची ब्रेथ अॅनालायझर यंत्राद्वारे तपासणी केली जाणार आहे.
जिल्हा खटलेदंड
कोल्हापूर१२०३१२४४८०००
सांगली८५१५१७२४१००
सातारा७०३११५९५६००
सोलापूर ग्रामीण९२०४१६१२९२०
पुणे ग्रामीण१३५९८३६५०५००