मुलांच्या कुस्ती स्पर्धा : कोल्हापूरच्या ओंकार, वैभव, पृथ्वीराज, प्रथमेश, शुभमची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 01:07 PM2018-11-13T13:07:45+5:302018-11-13T13:11:00+5:30
राजर्षी छत्रपती शाहू खासबाग मैदानात जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे आयोजित शालेय राज्यस्तरीय १९ वर्षांखालील मुलांच्या कुस्ती स्पर्धेच्या सोमवारी दुसऱ्या दिवशी १९ वर्षांखालील फ्री स्टाईल प्रकारात कोल्हापूरच्या शुभम विष्णू घोडे, वैभव संभाजी पाटील, प्रथमेश बाबासो गुरव, ओंकार शंकर चौगले, पृथ्वीराज बाबासाहेब पाटील यांनी आपल्या गटात बाजी मारली.
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू खासबाग मैदानात जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे आयोजित शालेय राज्यस्तरीय १९ वर्षांखालील मुलांच्या कुस्ती स्पर्धेच्या सोमवारी दुसऱ्या दिवशी १९ वर्षांखालील फ्री स्टाईल प्रकारात कोल्हापूरच्या शुभम विष्णू घोडे, वैभव संभाजी पाटील, प्रथमेश बाबासो गुरव, ओंकार शंकर चौगले, पृथ्वीराज बाबासाहेब पाटील यांनी आपल्या गटात बाजी मारली.
स्पर्धेच्या प्रत्येक गटातील पहिले एक ते तीन क्रमांकाचे निकाल अनुक्रमे असे : १९ वर्षांखालील फ्री स्टाईल प्रकारातील अंतिम निकाल - ५७ किलो गटात : निखिलेश शामू सारवान (अमरावती), दर्शन पारस निकम (नाशिक), संजय लंगूजी मोहारे (नागपूर), अनिकेत विलास पाटील (कोल्हापूर). ६१ किलो गटात : शुभम विष्णू घोडे (कोल्हापूर), शरद देवराम बिन्नर (नाशिक), महेश मधुकर तातपुरे (लातूर), सुमेध राजेश इंगळे (अमरावती).
६५ किलो गटात : वैभव संभाजी पाटील (कोल्हापूर), शुभम तानाजी वीर (पुणे), सूरज साहेबलाल यादव (मुंबई), भूषण नितीन राऊत (क्रीडा विद्यापीठ), ७० किलो गटात : प्रथमेश बाबासो गुरव (कोल्हापूर), निलेश मामा ढेंगल (पुणे), आशिष कैलास यादव (मुंबई), सौरभ सोपान काकडे (औरंगाबाद). ७४ किलो गटात : तुषार दिलीप जगताप (पुणे), संग्राम नंदकुमार मगर पाटील (कोल्हापूर), हर्षवर्धन शशिकांत लोमटे (औरंगाबाद), मुकेश अशोक बिराशी (नाशिक).
कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू खासबाग मैदानात जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे आयोजित शालेय राज्यस्तरीय १९ वर्षांखालील मुलांच्या कुस्ती स्पर्धेच्या ग्रीक रोमन प्रकारात १३० किलो गटात दीपक वडसकर (लातूर) व राहुल खरात (पुणे) यांच्यातील लढतीमधील एक क्षण. (छाया : नसीर अत्तार)
७९ किलो गटात : सोमनाथ सुरेश कोरके (औरंगाबाद) सर्वेश अनिल पातुर्डे (अमरावती), विनायक रंगराव गुरव (कोल्हापूर), दीपक माणिक पतंगे (लातूर). ८६ किलो गटात : ओंकार शंकर चौगले (कोल्हापूर), गणेश सुनील भगत (पुणे), उमर सैपन शेख (औरंगाबाद), प्रसाद भाऊसाहेब शिंदे (लातूर), ९२ किलो गटात : पृथ्वीराज बाबासाहेब पाटील (कोल्हापूर), अर्जुनसिंग निहालसिंग सूतबन (औरंगाबाद), तेजस अशोक उराडे (नागपूर), सुहास सतीश अपंळकर (नाशिक). ९७ किलो गटात : अभिषेक राजकुमार देवकाते (पुणे), साहिल सलिम मुल्ला (कोल्हापूर), विशाल त्रिंबक पोळकर (औरंगाबाद), आशुतोष शत्रुघ्न चंदन (नाशिक).
कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू खासबाग मैदानात जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे आयोजित शालेय राज्यस्तरीय १९ वर्षांखालील मुलांच्या कुस्ती स्पर्धेच्या फ्री स्टाईल प्रकारात ८२ किलो गटात बबलू मुल्लाणी (औरंगाबाद) व तुषार येवले (लातूर) यांच्यातील लढतीमधील एक क्षण. (छाया : नसीर अत्तार)
ग्रीको रोमन : ५५ किलो गटात : मनोज बाळू धनवट (औरंगाबाद), निखिल मच्छिंद्र वाघ (पुणे), विकी अरुण चव्हाण (नाशिक), सुनील नामदेव जाधव (लातूर). ६० किलो गटात : ओंकार राजाराम जाधव( लातूर), संदीप रामदास बोडके (नाशिक), साद रेहमान सिंगल (औरंगाबाद), अमर संजय बोराटे (पुणे). ६३ किलो गटात : सुधीर नारायण लांडगे (लातूर), निलेश विठ्ठल आघाण (नाशिक), आभिषेक कुबेरदास माळगोंडे (पुणे), अनिकेत मारुती सावंत (कोल्हापूर).
६७ किलो गटात : प्रतीक राजन भंडारी (मुंबई), विजयकुमार धोंडिराम ठोंबरे (लातूर), रवि गमाजी वाघ (औरंगाबाद), अनिल संजय कारंडे (पुणे). ७२ किलो गटात : मंगेश दिलीप कोळी (लातूर), मनोज अशोक कातोरे (नाशिक), शिवाजी फटंन पाटील (कोल्हापूर), कुलदीप संतोष इंगळे (पुणे).
७७ किलो गटात : आकाश अंकुश पवार (पुणे), अभिषेक पोपटराव मळेकर (अमरावती), मनोज दिनकर जाधवर (क्रीडा प्रबोधनी), ओंकार सदाशिव निंबळे (मुंबई). ८२ किलो गटात : तुषार मोहन येवले (लातूर), बबलू अब्दुल मुल्लाणी (औरंगाबाद), सागर सुभाष मसूळकर (पुणे).