मिरची, मसाल्यांना महागाईचा ठसका..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:24 AM2021-03-18T04:24:34+5:302021-03-18T04:24:34+5:30
उन्हाळा आला की घरोघरी लाल मिरची आणि मसाल्यांपासून चटणी बनवली जाते. प्रत्येक कुटुंबाच्या चटणीची चव वेगवेगळी असते. त्यामुळे पदार्थही ...
उन्हाळा आला की घरोघरी लाल मिरची आणि मसाल्यांपासून चटणी बनवली जाते. प्रत्येक कुटुंबाच्या चटणीची चव वेगवेगळी असते. त्यामुळे पदार्थही वेगवेगळ्या चवीचे बनतात आणि हीच खासियत असते. त्यामुळे कुटुंबातील अन्य साहित्यांच्या खरेदीमध्ये तडजोड केली जाते; पण चटणीच्या बाबतीत असे होत नाही. एकदा पाच-सात किलो चटणी बनवली की वर्षभराची चिंता मिटते. त्यामुळेच सध्या लक्ष्मीपुरीतील मिरची बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी आहे.
गतवर्षी या काळात कोरोनाचा फैलाव सुरू झाला होता, तेव्हापासून मिरचीला मागणी तशी कमी आहे. तेव्हापासून मिरचीचे वाढलेले दर काही कमी झाले नाहीत. या चढ्या दरामुळे अनेक जणांनी साध्या मिरचीला प्राधान्य दिले आहे.
----
मिरची कर्नाटक, आंध्रमधून
कोल्हापुरात मिरचीची आवक कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधून होते. लवंगी, गरुड मिरची तसेच त्यातही साधा व हलका माल हैदराबादवरून येतो. अस्सल खवय्यांचे शहर असल्याने आणि मागणीमुळे अन्य शहरांच्या तुलनेत कोल्हापुरात चांगल्या दर्जाची मिरची येते, असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
------
२६ प्रकारचे मसाले
चटणी बनवण्यासाठी २६ प्रकारचे मसाले वापरले जातात. त्यांची आवक केरळ, राजस्थान आणि गुजरातमधून होते. काही कुटुंबात एकदम तिखट, तर काही कुटुंबात कमी तिखट चटणी बनवली जाते. त्यानुसार किलोमागे मसाले वापरले जातात.
---
मिरचीचा प्रकार आणि दर असे (किलोप्रमाणे)
बॅडगी (साधी) : ३०० ते ४००
अस्सल बॅडगी : ४५० ते ५५०
काश्मिरी लाल मिरची : ५०० ते ५५०
जवारी संकेश्वरी : १२०० ते १६००
जवारी (साधी) : २२० ते २८०
लवंगी : २२० ते २८०
-------------
मसाल्यांचे दर असे (किलोप्रमाणे)
धने : १२०
जिरे : २००
तीळ १२० -१४०
खसखस : १६००
खोबरे : २४०
मोहरी : ८०
मेथी : १००
हळदकांडी : ८१८०
हळदपूड : १४०
----
अन्य मसाले (दहा ग्रॅमप्रमाणे)
लवंग : १५
दालचिनी, काळेमिरी, शाहजिरे, त्रिफळ : प्रत्येकी १० रुपये
नाकेश्वर : ३०
रामपत्री : २०
वेलदोडे : २०
बदामफूल : २०
धोंडफूल : २०
तमालपत्री, हिंग खडा, जायफळ : प्रत्येकी १० रुपये
जायपत्री : ३०
हिरवे वेलदोडे : ३०
बडीशेप : २०
----
गेल्यावर्षीपासून मिरचीला मागणी तशी कमी आहे, तरीही मिरचीचे उत्पादनच कमी झाल्याने यंदा दर वाढूनच आले आहेत. प्रत्येक प्रकारच्या मिरचीची किलोमागे ५० ते ७० रुपयांनी दरवाढ झाली आहे.
सूरज हळदे (मिरची व्यावसायिक)
---
मसाल्यांची आवक चांगली आहे; पण यावर्षी सातत्याने पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्याने मसाल्यांचे दर ४ ते ५ रुपयांनी वाढले आहेत. विशेषत: खोबऱ्याचे दर वाढले आहेत.
गुलाब भोसले (व्यावसायिक आर.एन. मसाले)
---
फोटो नं १७०३२०२१-कोल-मिरची०१,०२
ओळ : उन्हाळा आला की घरोघरी चटणी बनविण्याची लगबग सुरू होते. बुधवारी कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी बाजारपेठेत मिरची खरेदीसाठी महिलांची गर्दी होती. (छाया : आदित्य वेल्हाळ)
--