चिल्लर पार्टीने घेतली फटाके न उडविण्याची प्रतिज्ञा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 05:54 PM2017-09-24T17:54:02+5:302017-09-24T17:54:27+5:30

Chillar party took a pledge not to fire | चिल्लर पार्टीने घेतली फटाके न उडविण्याची प्रतिज्ञा

चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीमार्फत रविवारी उपस्थित बालचमूने फटाके न उडविण्याची प्रतिज्ञा घेतली.

googlenewsNext

कोल्हापूर : चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीच्या बालसदस्यांनी रविवारी फटाके न उडविण्याची प्रतिज्ञा घेतली. चिल्लर पार्टीतर्फे येथील शाहू स्मारक भवनात ' कभी पास कभी फेल ' हा बालचित्रपट दाखविण्यात आला.

चिल्लर पार्टीतर्फे दर महिन्याच्या चौथ्या रविवारी मोफत बालचित्रपट दाखविण्यात येतात. यंदा या उपक्रमाचे हे दहावे वर्ष आहे. ' कभी पास कभी फेल ' या चित्रपटाच्या प्रदर्शनप्रसंगी फटाक्यांमुळे होणाºया दुष्परिणामांची माहिती चिल्लर पार्टीचे मिलींद यादव यांनी दिली. चित्रपट संपल्यावर उपस्थित सर्व बाल रसिकांनी उत्स्फुर्तपणे फटाके न उडविण्याची प्रतिज्ञा घेतली.

फटाक्यांचे पैसे वाचवून पुस्तके खरेदी करू, समाजोपयोगी काम करू, पर्यावरण वाचवू अशा आशयाची ही शपथ होती. चिल्लर पाटीर्चे अभय बकरे यांनी ही प्रतिज्ञा मुलांना सांगितली. यावेळी चिल्लर पार्टीचे विशाल चव्हाण, रविंद्र शिंदे, पद्मा दवे, साक्षी सरनाईक, श्रीनाथ काजवे, विजय शिंदे उपस्थित होते.

 

Web Title: Chillar party took a pledge not to fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.