राज्यातील ३२ साखर कारखान्यांची धुराडी थंडावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:25 AM2021-03-10T04:25:16+5:302021-03-10T04:25:16+5:30
कोपार्डे - राज्यातील १८७ साखर कारखान्यांकडून ८ कोटी ४३ लाख ८६ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. राज्याचा ...
कोपार्डे - राज्यातील १८७ साखर कारखान्यांकडून ८ कोटी ४३ लाख ८६ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.३ टक्के असून ८ कोटी ६९ लाख ३५ हजार क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. सध्या राज्यातील ३२ साखर कारखान्यांची धुराडी थंडावली असून साखर हंगाम मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत चालण्याची शक्यता आहे.
कोरोना महामारी व ऊसतोड मजुरांची टंचाई यामुळे राज्यातील साखर कारखान्यांसमोर हंगाम सुरू करण्याचे मोठे संकट निर्माण झाले होते. पण सप्टेंबरनंतर कोरोनाचा कहर कमी झाला. ऊस दराबाबत कारखानदार व शेतकरी संघटना यांच्यामध्ये तडजोड झाली. नोव्हेंबर महिन्यानंतर राज्यातील कारखान्यांच्या गाळप हंगामाला गती मिळाली. राज्यात सहकारी ९५, तर खासगी ९२ असे एकूण १८७ साखर कारखान्यांनी हंगाम यशस्वी पार पाडले.
राज्यात कोल्हापूर विभाग ऊस गाळप, सरासरी साखर उतारा व साखर उत्पादनात आघाडीवर आहे. पुणे विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे. ४ एप्रिलपर्यंत राज्यातील ३२ साखर कारखान्यांची धुराडी थंडावली. यात सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक २५ साखर कारखाने आहेत. कोल्हापूर २, पुणे -१, औरंगाबाद, नांदेड प्रत्येकी, नागपूर २ असे कारखाने बंद झाले आहेत. हंगाम मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सुरू राहणार आहे. राज्यात अजूनही ५० ते ६० लाख मे. टन ऊस गाळपाविना उभा असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
४ एप्रिलपर्यंत राज्यातील साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाचा लेखाजोखा लाख मे. टनात
विभाग - ऊस गाळप - साखर उत्पादन उतारा टक्के
कोल्हापूर २०४.३३ २४२.४६ ११.८७
पुणे १८५.१८ १९७.३५ १०.६६
सोलापूर १६८.८७ १५७.०३ ९.३
अहमदनगर १२७.१३ १२१.३७ ९.५५
औरंगाबाद। ७३.२६ ६८.६८ ९.२९
नांदेड ७५.०५ ७४.६ ९.८७
अमरावती। ५.८१ ५.२ ८.९५
नागपूर ३.५३। ३.२ ९.०७ ------------------------------------------------------------
एकूण ८४३.८६ ८६९.३६ १०.३