आजरा कारखान्याचे धुराडे येत्या गळीत हंगामात पेटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:17 AM2021-06-24T04:17:19+5:302021-06-24T04:17:19+5:30
: आर्थिक संकटामुळे कारखाना दोन वर्षांपासून बंद आजरा : आजरा साखर कारखाना आर्थिक संकटात सापडल्याने गेल्या दोन वर्षांपासून बंद ...
: आर्थिक संकटामुळे कारखाना दोन वर्षांपासून बंद
आजरा : आजरा साखर कारखाना आर्थिक संकटात सापडल्याने गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे. जिल्हा बँकेने आपल्या थकीत कर्जासाठी कारखाना ताब्यात घेतला आहे. जिल्हा बँकेच्या कर्जाची संपूर्ण रक्कम उद्या, गुरुवार (२४) जून रोजी भरली जाणार आहे. त्यामुळे कारखान्याचे धुराडे येत्या गळीत हंगामात पुन्हा एकदा पेटणार आहे.
आजरा साखर कारखान्याने जिल्हा बँकेकडून घेतलेल्या कर्जाचा हप्ता थकीत राहिल्याने बँकेने २६ मे २०२० पासून कारखाना आपल्या ताब्यात घेतला आहे. जिल्हा बँकेने कारखाना ताब्यात घेतेवेळी १ लाख ८० हजार साखर पोती अंदाजे ५६ कोटी रुपयांची शिल्लक होती. त्याची विक्री जिल्हा बँकेकडून करण्यात आली आहे.
गेल्या गळीत हंगामात साखर कारखाना सुरू करण्यासाठी आमदार प्रकाश आबिटकर, कारखान्याचे अध्यक्ष सुनील शिंत्रे सर्व संचालक मंडळ यांच्याकडून थकहमीची रक्कम मिळवण्यासाठी भरपूर प्रयत्न झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोरही आजरा कारखान्याबाबत चर्चा झाली. मात्र, कारखाना सुरू झाला नाही.
जिल्हा बँकेचे असणारे ६९ कोटी ८३ लाखांचे कर्ज भरण्यासाठी नामदार हसन मुश्रीफ, नामदार सतेज पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील, कारखान्याचे सर्व आजी-माजी संचालक, तालुक्यातील सहकारी संस्थांचे पदाधिकारी यांनी संघटित प्रयत्न केला आहे. त्याला यशही आले आहे.
थकीत कर्जाच्या रकमेपैकी काही रक्कम आज भरण्यातही आली आहे. उर्वरित रक्कम उद्या भरली जाणार आहे. त्यानंतर कारखान्याचा ताबा जिल्हा बँकेकडून कारखाना प्रशासनाकडे लिा??????? जाणार आहे. त्यामुळे येत्या गळीत हंगामात आजरा साखर कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे.