चिमुकल्यांचा सुट्टी मूड कायम; अभ्यासाचाच पडला विसर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:26 AM2021-07-14T04:26:55+5:302021-07-14T04:26:55+5:30
ऑनलाईन शिक्षणाला काही मर्यादा असल्याने या स्वरूपातील शिक्षण प्रभावी ठरत नाही. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या बहुतांश विद्यार्थ्यांसाठी तर हे ...
ऑनलाईन शिक्षणाला काही मर्यादा असल्याने या स्वरूपातील शिक्षण प्रभावी ठरत नाही. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या बहुतांश विद्यार्थ्यांसाठी तर हे शिक्षण एकतर्फी असल्याचे दिसत आहे. शिक्षकांसमवेत विद्यार्थ्यांचा संवाद होत नसल्याने औपचारिक स्वरूपात हे शिक्षण सध्या सुरू आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे अभ्यासामध्ये लक्ष लागत नसून ती अद्याप सुट्टीच्या मूडमध्ये असल्याचे दिसत आहेत.
पॉंईंटर
पहिलीचे विद्यार्थी : ५५३०१
दुसरीचे विद्यार्थी : ५७४५२
तिसरीचे विद्यार्थी : ५७६०९
चौथीचे विद्यार्थी : ५७८३४
चौकट
अक्षर ओळख होईना
इयत्ता पहिली आणि दुसरीच्या वर्गामध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांना अक्षर ओळख करून दिली जाते. मात्र, सध्या ऑनलाईन शिक्षणामुळे त्यामध्ये अडचणी येत आहेत. या विद्यार्थ्यांना अक्षर ओळख करणे शक्य होईना.
पॉंईंटर
अभ्यास टाळण्यासाठी कारणे अनेक
१) ऑनलाईन क्लासमधील काही समजेना
२) शिक्षक काय सांगतात ते कळत नाही
३) मोबाईल बघून कंटाळा आला आहे
४) मान आणि डोळे दुखत आहेत
चौकट
पालकांनी घरातच घ्यावी शाळा
कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या शाळा ऑफलाईन पद्धतीने लवकर सुरू होण्याची शक्यता सध्या तरी नाही. ऑनलाईन शिक्षणही या विद्यार्थ्यांसाठी फारसे उपयुक्त ठरत नाही. अशावेळी या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांची घरातच शाळा घ्यावी.
पालकांची अडचण वेगळीच
विद्यार्थी संख्या कमी असल्याने आठवड्यातील तीन दिवस माझ्या मुलीची शाळा भरते. शाळेतून आल्यानंतर तेवढ्यापुरते ती अभ्यास करते, परत शाळा नसली, की तिला अभ्यासचा विसर पडतो.
-राजश्री कांबळे, सोनाळी.
मोबाईल हातात असला, की ऑनलाईन लेक्चर झाल्यानंतर अधिकत्तर वेळ मुले गेम खेळत बसतात. त्यांचे अभ्यासाकडे लक्ष लागत नाही. कोरोना कमी असलेल्या भागात १० ते १५ विद्यार्थ्यांच्या बॅचेस करून ऑफलाईन पद्धतीने वर्ग भरविण्यात यावेत.
-शिवाजी सरनाईक, कंदलगाव.