चिंचवाडला प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:21 AM2021-02-15T04:21:49+5:302021-02-15T04:21:49+5:30
शुभम गायकवाड : उदगाव : शिरोळ तालुक्यातील सहा हजार लोकसंख्येच्या चिंचवाड (ता. शिरोळ) गावात नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीने आरोग्य उपकेंद्राची ...
शुभम गायकवाड :
उदगाव : शिरोळ तालुक्यातील सहा हजार लोकसंख्येच्या चिंचवाड (ता. शिरोळ) गावात नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीने आरोग्य उपकेंद्राची गरज असून. त्यासाठी उदगाव येथील आरोग्य उपकेंद्र चिंचवाडला स्थलांतरित करावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
चिंचवाड हे शिरोळ तालुक्यातील सहा हजार लोकसंख्येचे गाव आहे. शेजारील उदगाव येथे दोन प्राथमिक आरोग्य उपकेंद्रे, नव्याने ग्रामीण रुग्णालय व मनोरुग्णालय मंजूर आहे. त्यामुळे येथील एक उपकेंद्र दुसरीकडे हलविण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. तत्पूर्वी चिंचवाड ग्रामपंचायतीने उदगावचे उपकेंद्र चिंचवाडला हलवावे, अशी मागणी केली आहे. त्यासाठी पाच गुंठे जागाही नियोजित केली आहे. आता लोकप्रतिनिधींनी यावर भूमिका घेऊन तातडीने आरोग्याची सोय करावी, अशी मागणी चिंचवाडकर करत आहेत.
कोट :
चिंचवाड ग्रामपंचायतीची उपकेंद्र स्थलांतराची मागणी रास्त आहे. त्यांचा प्रस्ताव आम्हाला मिळाला आहे. त्याचा पाठपुरावा करून तातडीने त्यास मंजुरी घेऊ.
- स्वाती सासणे, समाजकल्याण सभापती जि. प. कोल्हापूर.
कोट -
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जागेचा प्रश्न सुटला आहे. म्हणून आम्ही त्याचा मागणी प्रस्ताव पाठविला आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्ही निर्णयाच्या प्रतीक्षेत आहोत.
- परमानंद उदगावे, ग्रा.पं. सदस्य, चिंचवाड