ग्रामसभेत होणार लाभार्थीची निवड
By admin | Published: August 22, 2016 12:32 AM2016-08-22T00:32:54+5:302016-08-22T00:32:54+5:30
कुणाल खेमनार : ‘प्रधानमंत्री आवास’च्या प्राधान्यक्रम याद्यांची तयारी
कोल्हापूर : सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण - २०११ नुसार ‘प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण’ची प्राधान्यक्रम याद्यांची तयारी सुरू झाली आहे. गावसभेपुढे सक्षम अधिकाऱ्यांसमोर नावे जाहीर करून याद्या तयार केल्या जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी पत्रकातून दिली.
ग्रामपंचायत व संवर्गनिहाय याद्या ग्रामविकास विभागाकडून उपलब्ध करून दिल्या आहेत. तालुकास्तरीय कमिटीने यादीनुसार निकषांनुसार घरांची तपासणी करून प्रस्ताव जिल्हास्तरीय कमिटीकडे सादर केले जाणार आहेत. गावसभेपूर्वी आठ दिवस पात्र यादी सूचनाफलकावर प्रसिद्ध करावयाची आहे. गावसभेत गटविकास अधिकारी, पंचायत समितीच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत यादी ठेवावी. अपात्र कुटुंबांची नावे वगळून संवर्गानुसार स्वतंत्र यादी करताना मूळ यादीतील प्राधान्यक्रम अबाधित ठेवावा लागणार आहे. प्राधान्यक्रमाचे निकष पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांनी ग्रामपंचायत, पंचायत समिती कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. कुणाल खेमनार यांनी पत्रकातून केले आहे.
ग्रामसभेने सुचविलेल्यांचीही
यादी होणार
उपलब्ध प्राधान्यक्रम यादीमध्ये समावेश नसलेल्या; पण प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ देण्यासाठी ग्रामसभेने सुचविलेल्या नवीन कुटुंबांच्या संवर्गनिहाय स्वतंत्र याद्या कारणासहीत तयार करण्याच्या सूचनाही ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत. ग्रामसभेने न सुचविलेले लाभार्थीही सहा महिन्यांत अपील करू शकतात.
लाभार्थ्यांच्या घराचे निकष
गवत, पेरू (कूड), बांबू, प्लास्टिक, पॉलिथिन, कच्च्या विटांच्या भिंती व लाकूड, चुन्याचा वापर न केलेले दगडी भिंतींचे बांधकाम असावे. तसेच गवत, कूड, बांबू, प्लास्टिक, पॉलिथीन, हातांनी तयार केलेली कौले असे छप्पर असावे.
प्राधान्यक्रम यादीसाठीचे निकष
४कुटुंबात १६ ते ५९ वयोगटातील एकही प्रौढ व्यक्ती नसणे.
४१६ ते ५९ वयोगटातील एकही पुरुष नसणारे, महिला कुटुंबप्रमुख.
४२५ वर्षांहून अधिक वय असणारा प्रौढ साक्षर असा एकही सदस्य नसणारे कुटुंब.
४अपंग कुटुंब सदस्य असणारे व सक्षम सदस्य नसणारे कुटुंब.
४मानवी श्रमाद्वारे उत्पन्न मिळविणारे भूमिहीन कुटुंब.