पालकमंत्र्यांकडून ‘आमदार आदर्श’साठी तीन गावांची निवड

By Admin | Published: January 21, 2016 12:05 AM2016-01-21T00:05:59+5:302016-01-21T00:28:07+5:30

लोकमत इफेक्ट : तीन आमदारांचे अजूनही दुर्लक्ष

The choice of three villages for 'MLA Model' by Guardian Minister | पालकमंत्र्यांकडून ‘आमदार आदर्श’साठी तीन गावांची निवड

पालकमंत्र्यांकडून ‘आमदार आदर्श’साठी तीन गावांची निवड

googlenewsNext

कोल्हापूर : मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून आकारास आलेल्या ‘आमदार आदर्श ग्राम योजने’तून गावांची निवड करण्याचा विसर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह दोन आमदारांना पडला, अशा आशयाची बातमी ‘लोकमत’मध्ये ८ जानेवारीला प्रसिद्ध झाली. तिची दखल घेऊन मंत्री पाटील यांनी कसबा वाळवे (ता. राधानगरी), दारवाड (ता. भुदरगड) व हनिमनाळ (ता. गडहिंग्लज) या तीन गावांची निवड केली आहे.
दरम्यान, अजूनही आमदार चंद्रदीप नरके, आमदार सत्यजित पाटील आणि नव्याने निवडून आलेले विधान परिषदेचे आमदार सतेज पाटील यांनी गावांची निवड केलेली नाही. आमदार नरके आणि सत्यजित पाटील हे गावांची निवड करण्याबाबत का उदासीन आहेत, असा प्रश्न विचारला जात आहे. संबंधित अधिकारी गावांच्या निवडीसाठी पाठपुरावा करीत आहेत; पण आमदार असल्यामुळे अधिकाऱ्यांनाही मर्यादा येत आहेत. परिणामी निवडच न झाल्याने या दोन आमदारांच्या मतदारसंघात आमदार आदर्श ग्राम योजनेच्या कामांच्या प्रारंभाचा नारळही फुटलेला नाही. त्यामुळे नूतन आमदार सतेज पाटील यांच्यासह दोन आमदारांनीही त्वरित गावांची निवड करावी, अशी मागणी होत आहे.
एक हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांची या योजनेनुसार निवड करणे अपेक्षित आहे. प्रत्येक विधानसभा आणि विधान परिषद आमदाराने तीन गावांची निवड करावयाची आहे. टप्प्याटप्प्याने निवडलेली तीन गावे आदर्श करावयाची आहेत. हे तीन आमदार वगळता उर्वरित सर्व आमदारांनी गावे निवडलेली आहेत. पहिल्या टप्प्यातील जागृतीचे काम सुरू आहे.

अशी आहे योजना
सांसद आदर्श गाव योजना केंद्र शासनाने सुरू केली. त्याच धर्तीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यात आमदार आदर्श ग्राम योजनेचा
८ आॅक्टोबर २०१५ मध्ये अंमलबजावणी आदेश काढण्यात आला. लोकांचा सहभाग, स्त्री-पुरुष समानता, महिलांना सन्मानाची वागणूक, आर्थिक व सामाजिक न्याय, श्रमाची प्रतिष्ठा, स्वच्छतेची संस्कृती, पर्यावरण संतुलन, नैतिक मूल्यांचे पालन, नैसर्गिक मूल्यांचे जनत, आदी कामे योजनेतून करण्यात येणार आहेत. लोकसहभागातून अन्य गावांसमोर आदर्श ठेवण्यासाठी सर्वांगीण विकास करणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.

Web Title: The choice of three villages for 'MLA Model' by Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.