चिकोडी मतदारसंघात हुक्केरी की ज्वोल्ले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 12:30 AM2019-04-29T00:30:12+5:302019-04-29T00:30:16+5:30

निपाणी : चिकोडी लोकसभेसाठी २३ एप्रिल रोजी मतदान झाल्यानंतर आता कार्यकर्त्यांकडून विजयाची आकडेमोड सुरूझाली आहे. निकाल २३ मे रोजी ...

Chokdi constituency hookah khoyle! | चिकोडी मतदारसंघात हुक्केरी की ज्वोल्ले !

चिकोडी मतदारसंघात हुक्केरी की ज्वोल्ले !

googlenewsNext

निपाणी : चिकोडी लोकसभेसाठी २३ एप्रिल रोजी मतदान झाल्यानंतर आता कार्यकर्त्यांकडून विजयाची आकडेमोड सुरूझाली आहे. निकाल २३ मे रोजी असला तरी संभाव्य निकालाची चर्चा लोकसभा मतदारसंघात जोरात आहे. यावेळी खासदार प्रकाश हुक्केरी हे पुन्हा बाजी मारणार की, सहकार नेते अण्णासाहेब ज्वोल्ले झटका देणार याविषयी चर्चा झडत आहेत.
चिकोडी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षातून खासदार प्रकाश हुक्केरी यांनी, तर भाजपकडून अण्णासाहेब ज्वोल्ले यांनी निवडणूक लढविली. दोन्ही नेते तुल्यबळ असल्याने ही लढत अतिशय अटीतटीची झाली. १५ लाख ७९ हजार ३०९ मतदारांपैकी १२ लाख १० हजार १२७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामुळे मतदानाची टक्केवारी ७५.४२ एवढी झाली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ७४ टक्क्यांवर मतदान झाले होते. यावेळी एक टक्का मतदान वाढले आहे.
निवडणुकीत काँग्रेसकडून प्रकाश हुक्केरी व भाजपकडून तत्कालीन खासदार रमेश कत्ती यांच्यात लढत झाली होती. या लढतीत हुक्केरी यांनी कत्ती यांना पराभूत केले; पण त्यावेळी हुक्केरी यांना फक्त तीन हजारांवर मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे ते मताधिक्य राहणार की घटणार? असा प्रश्न आहे. हुक्केरी हे मातब्बर नेते असले तरी यावेळच्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते रमेश जारकीहोळी यांची उघड नाराजी दिसल्याने याचा फटका काँग्रेसला बसू शकतो, तर ज्वोल्ले यांनाही कत्ती बंधूंच्या नाराजीचा फटका बसू शकतो. त्यामुळे निकाल नेमका कसा लागेल? याचा अंदाज अनेक राजकीय लोक लावत आहेत. २०१४ ला १० हजार पेक्षा जास्त मतदारांनी नोटाला मतदान केले होते.
आठही विधानसभा मतदारसंघांत बंपर मतदान
चिकोडी लोकसभा मतदारसंघात आठ विधानसभा मतदारसंघ येतात. यापैकी यावेळी निपाणी मतदारसंघात ७७.७१ टक्के, चिकोडी सदलगा मतदारसंघात ८०. ७९ टक्के, हुक्केरी ७२.१७ टक्के, अथणी ७५.२१, रायबाग ७१.७४, कुडची ६९.१६, कागवाड ७५.३१, यमकनमर्डी ८०.३० टक्के मतदान झाले आहे. यापैकी चिकोडी, अथणी, कागवाड व यमकनमर्डी मतदारसंघात काँग्रेसचा प्रभाव असून, बाकी मतदारसंघात भाजपचा प्रभाव आहे. त्यामुळे आता जनतेने कोणाच्या पारड्यात मते टाकली आहेत, हे २३ मे रोजी स्पष्ट होणार आहे.

Web Title: Chokdi constituency hookah khoyle!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.