परिपत्रक चुलीत घाला, आधी कनेक्शनचे बोला- शेतकऱ्यांचे खडेबोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 11:38 PM2019-05-06T23:38:07+5:302019-05-06T23:41:09+5:30
शेती पंपाच्या वीज जोडणीत चालढकल करणाºया महावितरण अधिकाऱ्यांना शेतकºयांनी सोमवारी चांगलेच खडेबोल सुनावले. अधिकारी सातत्याने शासन परिपत्रकाचा उल्लेख करू लागल्याने संतप्त शेतकºयांनी तुमचे परिपत्रक घाला चुलीत
कोल्हापूर : शेती पंपाच्या वीज जोडणीत चालढकल करणाºया महावितरण अधिकाऱ्यांना शेतकºयांनी सोमवारी चांगलेच खडेबोल सुनावले. अधिकारी सातत्याने शासन परिपत्रकाचा उल्लेख करू लागल्याने संतप्त शेतकºयांनी तुमचे परिपत्रक घाला चुलीत, कनेक्शन कधी देणार ते सांगा’, अशा शब्दांत संताप व्यक्त केला. प्रलंबित कनेक्शन महिन्याभरात न दिल्यास १ जून रोजी महावितरणच्या प्रवेशद्वाराला कुलूप ठोकू, असा इशाराही देण्यात आला.
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील शेतकरी पाच वर्षे वीज कनेक्शनच्या प्रतीक्षेत आहेत. महावितरणची डिपॉझिट भरूनही विभागातील १0 हजार शेतकरी कनेक्शन कधी मिळणार, यासाठी हेलपाटे मारत आहेत. बोअरवेल, विहिरी खोदल्या; पण कनेक्शन नसल्याने पाणी उपसा कसा करायचा, असा पेच आहे; त्यामुळे वीज जोडणी कधी देणार; यासाठी सोमवारी इरिगेशन फेडरेशनच्या वतीने महावितरणच्या अधिकाºयांना जाब विचारला. फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील-किणीकर, बाबासाहेब पाटील-भुयेकर, प्रताप होगाडे यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी यावेळी उपस्थित होते.
मागण्यांचे निवेदन विभागीय अधीक्षक अभियंता अनिल भोसले यांना देण्यात आले. शेतकºयांनी पैसे भरूनही कनेक्शन का दिले जात नाही. तुमचा ठेकेदार नेमका कोठे काम करीत आहे. जाणीवपूर्वक पश्चिम महाराष्ट्रातील शेतकºयांना टार्गेट केले जात असून, प्रामाणिक वीज भरणाºयांना अशी शिक्षा देणार असाल, तर हे खपवून घेणार नसल्याचे विक्रांत पाटील यांनी सांगितले. अधीक्षक अभियंता शैलेश राठोड हे शेतकºयांशी सूडबुद्धीने वागत असल्याचा आरोप प्रताप होगाडे यांनी केला.
शेतीपंपांना आठ तास वीज दिली म्हणून त्याप्रमाणे वसुली केली जाते; पण प्रत्यक्षात पाच ते सहा तासच वीज मिळत आहे. वारंवार वीज खंडित होत असल्याने शेतकरी त्रस्त आहेत. पैसे भरून शेतकºयांनी किती वर्षे वाट बघायची, महिन्यात प्रलंबित कनेक्शन दिली नाही, तर १ जून रोजी महावितरणच्या प्रवेशद्वाराला कुलूप ठोकू, असा इशारा विक्रांत पाटील यांनी दिला.
दरम्यान, उपसाबंदी विरोधात इरिगेशन फेडरेशनने पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांना निवेदन दिले.
पाच वर्षांत १६६ कनेक्शन
महावितरणच्या कनेक्शन जोडणीच्या गतीवर जोरदार टीका करताना विक्रांत पाटील म्हणाले, पाच वर्षांत केवळ १६६ कनेक्शन जोडण्यात आली. यावरून तुमच्या कामाची गती किती हे लक्षात येते.
इरिगेशन फेडरेशनच्यावतीने सोमवारी प्रलंबित शेतीपंपांना वीज कनेक्शन द्यावे, या मागणीचे निवेदन महावितरणचे विभागीय अधीक्षक अभियंता अनिल भोसले यांना दिले. यावेळी बाबासाहेब पाटील, प्रताप होगाडे, आदी उपस्थित होते.