पेठ वडगावात पारंपरिक गटात चुरशीचा सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:26 AM2021-08-28T04:26:55+5:302021-08-28T04:26:55+5:30

सुहास जाधव लोकमत न्यूज नेटवर्क पेठवडगाव : वडगाव पालिका निवडणुकीचे पडघम वाजण्यास शासकीय पातळीवर सुरुवात झाली आहे. खरी लढत ...

Churshi match in traditional group at Peth Wadgaon | पेठ वडगावात पारंपरिक गटात चुरशीचा सामना

पेठ वडगावात पारंपरिक गटात चुरशीचा सामना

Next

सुहास जाधव

लोकमत न्यूज नेटवर्क

पेठवडगाव : वडगाव पालिका निवडणुकीचे पडघम वाजण्यास शासकीय पातळीवर सुरुवात झाली आहे. खरी लढत सत्तारूढ युवक क्रांती आघाडी व विरोधी यादव गटात होण्याचे संकेत असून दोन्ही आघाडीत अपेक्षित संधी मिळाली नाही तर तिसरी आघाडी करण्याची धडपडत काही महत्त्वाकांशी कार्यकर्ते करीत आहेत. नगराध्यक्ष आरक्षण व प्रभागरचना यानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार असले तरी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

जिल्ह्यातील वडगाव ही शाहूकालीन क वर्ग नगरपालिका आहे. गत निवडणुकीत तत्कालीन सत्तारूढ यादव आघाडी विरोधात युवक क्रांती आघाडी, भाजप-जनसुराज्य अशी तिरंगी झाली होती. यामध्ये नगराध्यक्ष पदासह १३ जागा जिंकून युवक क्रांतीने बाजी मारली तर यादव गटाला चार जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी पारंपरिक गटांनी व्यूहरचना सुरू केली आहे. युवक क्रांतीची जोडणी व विजयाचे शिल्पकार दिलीपसिंह यादव, आर. डी. पाटील, विश्रांत माने, डाॅ. व्ही. जी. बेळे यांचे निधन झाले आहे. त्यामुळे गटनेत्या प्रविता सालपेसह अन्य शिलेदारांना प्रयत्न करावे लागणार आहेत. नगरसेवक व प्रमुख कार्यकर्ते आपल्या सोबत राहतील यांची दक्षता घ्यावी लागेल तर विरोधी यादव आघाडीच्या नेत्या विद्या पोळ यांनी पराभवाचा वचपा काढण्याचा चंग बांधला असून त्यादृष्टीने रणनीती आखली आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांना मानणारा यादव गट आहे.तसेच राष्ट्रवादी, भाजप यांच्याशी युवक क्रांतीची जवळीकता आहे विधानसभा निवडणुकीत दोन्हीही गटांनी ताकतीने आमदार राजू आवळे यांना मदत केली. त्यामुळे पालिका निवडणुकीत आवळे तटस्थ राहण्याची शक्यता आहे. पालिकेत सत्ता कायम ठेवण्यासाठी युवक क्रांतीची तर सत्तांतर करण्यासाठी यादव आघाडीची व्यूहरचना सुरू आहे. एकत्रित साडेचार वर्षे काराभाराबाबत नागरिकांच्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत. एका बाजूला विकासकामे तर दुसऱ्या बाजूस कामाच्या दर्जाबाबत सत्तारूढ गटाच्या काही नगरसेवकांसह नागरिकांच्या तक्रारी होत्या. तसेच सत्ताधाऱ्यांमध्ये अंतर्गत कलह आणि कुरघोडी वाढल्यामुळे नागरिकांमध्ये काहीशी नाराजी दिसत आहे.

घडले-बिघडले..!

सत्तारूढ गटाच्या नगरसेवकांचा सभात्याग, एकसंघतेचा अभाव, विकासकामाचा असमतोल

५ वर्षातील कामे

संभाजी उद्यान विकसित, छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा, ओपन जिम, मिनी हायमास्ट दिवे, स्वागत कमानी, पालिकेची जागा नावावर, भाजी मार्केट पुनर्बांधणी, सुधारित पाणी पुरवठा (१२ कोटी)

वार्षिक उत्पन्न: १० कोटी २० लाख (शासकीय अनुदाने वगळून)

लोकसंख्या : २५ हजार ६९१

एकूण मतदार: २०,९९६

उत्पन्नाची साधने : घरफाळा, पाणीपट्टी, दुकान भाडे, बाजारकर, शासकीय अनुदाने

चाचपणी सुरू

सत्तारूढ युवक क्रांतीने एकसंघ ठेवण्यासाठी तर यादव गटाने सत्तारूढ गटाच्या कारभारामुळे दुखावलेल्यांची मोट बांधण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. डाॅ. अशोक चौगुले यांचा गटही निर्णायक आहे. तसेच भाजपचीही चाचपणी सुरू आहे.

वडगाव पालिकेत १९८५ नंतरचा इतिहास पाहिला तर यादव आघाडी, युवक क्रांती आघाडी यांना आलटून पालटून संधी मिळाली आहे. यास २०११ चा अपवाद आहे. २००६, २०११ च्या पालिका निवडणुकीत यादव गट सलग दोन वेळा विजयी झाला होता. आता होणाऱ्या निवडणुकीत विजयसिंह यादव, शिवाजीराव सालपे यांचे वारसदार विद्या पोळ, प्रविता सालपे या दोघी दुसऱ्यांदा नेतृत्व करतील.

एकूण १७ प्रभाग

अनुसूचित जातीसाठी दोन जागा (महिला, पुरुष) नागरिकांचा मागासप्रवर्ग पाच जागा (तीन महिला, दोन पुरुष) सर्वसाधारण महिला व पुरुष प्रत्येकी पाच जागा.

Web Title: Churshi match in traditional group at Peth Wadgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.