कागल तालुक्यात चुरशीने मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:29 AM2021-01-16T04:29:01+5:302021-01-16T04:29:01+5:30
सकाळपासूनच मतदानासाठी लोक बाहेर पडल्याचे चित्र होते. कार्यकर्तेही चौकाचौकात जमा झाले होते; तर उमेदवार मतदान केंद्रांवर स्वागतासाठी ऊभे होते. ...
सकाळपासूनच मतदानासाठी लोक बाहेर पडल्याचे चित्र होते. कार्यकर्तेही चौकाचौकात जमा झाले होते; तर उमेदवार मतदान केंद्रांवर स्वागतासाठी ऊभे होते. मतदान केंद्रावर मतदारांना ने-आण करण्याकरिता खासगी वाहनांची व्यवस्था अनेक ठिकाणी होती. सकाळी दहानंतर दुपारी एकपर्यंत मतदारांची गर्दी होऊन रांगा लागल्या होत्या. दुपारी मतदान केंद्रावर गर्दी कमी होती. सायंकाळी चारनंतर पुन्हा गर्दी दिसत होती. परगावाहूनही मतदारांना आणण्याची सोय कार्यकर्त्यांनी केली होती. तालुक्यात दुपारी एकपर्यंत इतके ६० टक्के मतदान झाले होते. जिल्हा पोलीसप्रमुख शैलेश बलकवडे यांनी सिद्धनेर्ली गावास भेट दिली तर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत अमृतकर यांनी बाणगे, म्हाकवे, आणूर या गावांना भेटी देऊन मतदानाचा आढावा घेतला. निवडणूक निरीक्षक आणि उपजिल्हाधिकारी अश्विनी जिरंगे, तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनीही गावांना भेटी दिल्या. मुख्याधिकारी आणि व्होटिंग मशीन निरीक्षक पंडित पाटील यांनी प्रत्येक केंद्रावर जाऊन मशीनचा आढावा घेतला. एकूण ४८ मशीन तयार होती.
मंत्री मुश्रीफांचे मतदान.
..
लिंगनूर दुमाला येथे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मतदान केले. दुपारी तीन वाजता ते थेट मुंबईहून मतदानासाठी या गावात आले तर भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी शिंदेवाडी गावात मतदान केले. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनीही लिंगनूर दुमाला येथे मतदान केले.
फोटो कॅपशन
करनूर (ता. कागल) येथे दिव्यांग मुलीने आईसमवेत येऊन मतदान केले.
करनूर येथे एका मतदार केंद्रावर महिला उमेदवार स्वागतासाठी अशा उभ्या होत्या.