वस्त्रनगरी बनतेय ‘क्राईम’नगरी

By admin | Published: March 31, 2015 10:26 PM2015-03-31T22:26:13+5:302015-04-01T00:05:48+5:30

पोलीस यंत्रणा ‘जैसे थे’ : अवैध धंदे पुन्हा डोके वर काढताहेत

'Cinema' is becoming the textile mogul | वस्त्रनगरी बनतेय ‘क्राईम’नगरी

वस्त्रनगरी बनतेय ‘क्राईम’नगरी

Next

अतुल आंबी - इचलकरंजी शहरातील पोलीस दलात काही बदल झाले आणि अंतर्गत नियोजन बिघडत गेले. चोऱ्यांचे प्रमाण वाढत गेले. धूम स्टाईलने दिवसाढवळ्या महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणे, वाहनांवरून जाणाऱ्या लोकांच्या बॅगा चोरून लाखो रुपये पळवून नेणे, यासह घरफोड्या, आॅनलाईन बॅँक खात्यावरून चोरी, वाटमारी, शस्त्रांचा धाक दाखवून वेळप्रसंगी मारहाण करून जबरी चोऱ्या यांचा सपाटाच सुरू झाला. आता जिल्ह्यातील मोठा दरोडा इचलकरंजीतील भरवस्तीत पडला. यामध्ये सुमारे साडेचार कोटी रुपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी पळविला. मात्र, पोलीस यंत्रणा ‘जैसे थे’ परिस्थितीतूनच जाताना दिसत आहे.
शहराची वाढती लोकसंख्या, त्याचबरोबर वाढता गुन्हेगारी आलेख पाहता नव्याने एक पोलीस ठाणे सुरू करण्यात आले. तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक निर्माण केले. शहरातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची सर्व रिक्त पदे भरली. त्यामुळे शहर पोलीस दलाची संख्या सुमारे ३००च्या वर पोहोचली. आता चोरी, मारामारी यासह अवैध व्यवसायांवर अधिक जरब बसणे गरजेचे होते. मात्र, परिस्थिती वेगळीच झाल्याचे चित्र आहे. आता हळूहळू अवैध व्यवसायिकही आपले डोके वर काढताना दिसत आहेत. शहर परिसरात किरकोळ स्वरूपात उघडपणे मटका, जुगार, गावठी दारूचे अड्डे सुरू झाल्याचे दिसून येत आहे. तीन दिवसांपूर्वी भरचौकात पडलेल्या दरोड्यामुळे तर पोलिसांची चांगलीच नाचक्की झाली आहे. विशेष म्हणजे साडेचार कोटींचा मुद्देमाल लुटून नेला असला, तरी पोलिसांनी तत्काळ तपास यंत्रणा गतिमान न करता हद्दीचा वाद व पाहणी तपासणी करण्यात वेळ काढला. त्यामुळे पाठलाग किंवा नाकाबंदी होऊ शकली नाही. त्याचबरोबर पोलिसांवर येणारे अधिकाऱ्यांचे गंडांतर यामुळे कित्येक पोलिसांचे खबरे दुरावले गेले आहेत, तर कित्येक नव्याने आलेले अधिकारी व पोलीस अबोल असल्यामुळे त्यांचे खबऱ्यांचे नेटवर्कच नाही. त्यामुळे अशा खबऱ्यांच्या माध्यमातून उघडकीस येणारे गुन्हे थांबले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून शहरातील पोलीस यंत्रणा सुरळीत करावी, अशी मागणी होत आहे.

एस. चैतन्य गप्प का ?
आयपीएस अधिकारी एस. चैतन्य यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या कार्यक्षेत्रातील अवैध व्यावसायिकांवर त्यांनी बसविलेली जरब हळूहळू ढिली होत चालल्याने नागरिकांत संभ्रम निर्माण होत आहे. चैतन्य यांची बदली झाली का?, त्यांच्या अधिकारावर कोणते बंधन आले का? यासह अनेक प्रश्न सामान्य नागरिकांतून उपस्थित केले जात आहे.



खाबुगिरीमुळे परिस्थिती बदलली
हद्दीतील अवैध व्यवसाय मोडून निघावेत, सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन सुरळीतपणे चालावे, उद्योजक, व्यापारी यांनी निर्भयपणे आपला व्यवसाय करावा, अशी प्रामाणिक इच्छा बाळगून आपले कर्तव्य चोखपणे पार पाडणारे अनेक पोलीस कार्यरत आहेत. त्यांनी एस. चैतन्य यांना चांगली साथ दिल्यानेच सर्व काही शक्य झाले होते. मात्र, खाबुगिरी मानसिकतेच्या काही पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांमुळे सध्या परिस्थिती बदलल्याचे दिसत आहे.

Web Title: 'Cinema' is becoming the textile mogul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.